मुंबई : मुंबईच्या रेड झोनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत सध्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग 12 दिवसांवर आला आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून मुंबईत रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांची चिंताही वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेचे 5 वॉर्ड असे आहेत, ज्यात प्रत्येकी 2 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. (Mumbai Corona Patients Wardwise Update)
मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या 38 रुग्णांची वाढ झाली आहे. धारावीत एकूण रुग्णांची संख्या 1621 वर पोहोचली आहे. दादरमध्ये सहा रुग्ण वाढल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 245 वर पोहोचला आहे. तर माहिममध्ये 24 नवे रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 375 वर पोहोचली आहे.
टॉप 10 वॉर्ड
1. जी उत्तर– मुंबईत सर्वाधिक 2598 रुग्णसंख्या – धारावी, दादर, माहिमचा भाग. इथे 17 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट
2. ई– 2331 रुग्ण – भायखळा, मुंबई सेंट्रलचा भाग. इथे 17 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट
3. एफ उत्तर– 2292 रुग्ण – वडाळा, सायन, माटुंगाचा भाग. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी इथेही 17 दिवस
4. एल – 2197 रुग्ण – कुर्ल्याचा भाग. 11 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
5. एच पूर्व- 2006 रुग्ण – वांद्रे पूर्व, सांताक्रूझचा भाग. 12 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
6. के पश्चिम – 1968 रुग्ण – अंधेरी पश्चिमचा भाग. 14 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
7. जी दक्षिण- 1811 रुग्ण – वरळी, प्रभादेवीचा भाग. 20 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
8. के पूर्व – 1741 रुग्ण – अंधेरी पूर्व, जोगेश्वरीचा भाग. 10 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
9. एम पूर्व – 1620 रुग्ण – गोवंडी, मानखुर्दचा भाग. 14 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
10. एफ दक्षिण – 1530 रुग्ण – परळचा भाग. 9 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट
(Mumbai Corona Patients Wardwise Update)
पहा व्हिडीओ :
राज्यात कालच्या दिवसात 2091 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 97 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे. काल 1168 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 954 इतकी झाली आहे. सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
#CoronavirusUpdates
२६ मे, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/0ivqDCJvrr— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2020