मुंबई : मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनंतर महापालिकेने मायक्रो कंटेटमेंट झोन आणि इमारतीतील रुग्ण राहत असलेले मजले सील करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सध्या 97 कंटेंटमेंट झोन आहेत. तर 1169 सील बिल्डींग/ मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत. एकूण 10 हजार 797 मजले सील केलेले आहेत. टी वॉर्ड मुलुंडमध्ये मजले सील करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. (Mumbai Corona Update Micro Containment Zones and Sealed building floors)
मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजे काय?
पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायटींना मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणतात. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणे आवश्यक आहे.
या सोसायट्यांनी कोव्हिड संबंधी नियम पाळणे बंधनकारक आहे. बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वाचे निरीक्षण करुन नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी घ्यावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करुन नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.
महत्त्वाचे नियम काय?
– इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्यात येतील
– बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेशबंदी
– वर्तमानपत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे
– जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावे
– सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे
– कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार
मुंबईतील ताजी आकडेवारी काय?
16 एप्रिल, संध्या 6:00 वाजता
24 तासात बाधित रुग्ण – 8,839
24 तासात बरे झालेले रुग्ण – 9033
बरे झालेले एकूण रुग्ण – 4,63,344
बरे झालेल्या रुग्णांचा दर- 82%
एकूण सक्रिय रुग्ण-85,226
(Mumbai Corona Micro Containment Zones)
दुप्पटीचा दर- 43 दिवस
कोविड वाढीचा दर (9 एप्रिल-15 एप्रिल)- 1.6%
#CoronavirusUpdates
१६ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -८८३९
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९०३३
बरे झालेले एकूण रुग्ण- ४,६३,३४४
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८२%एकूण सक्रिय रुग्ण-८५,२२६
दुप्पटीचा दर- ४३ दिवस
कोविड वाढीचा दर (९ एप्रिल-१५ एप्रिल)- १.६०%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 16, 2021
संबंधित बातम्या :
देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण, 1341 जण दगावले
(Mumbai Corona Update Micro Containment Zones and Sealed building floors)