मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कडक लॉकडाऊन, कठोर निर्बंधांसह नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासाठी मुंबईत 3 नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी गुरुवारी दिली. त्यानंतर वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Congress MLA Zeeshan Siddiqui unhappy on inauguration of new corona vaccination center in Bandra East)
काल माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का? असा सवाल आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत शिवसेनेला विचारला आहे.
A covid-19 vaccine centre was inaugurated yesterday in my Vandre East assembly by Shiv Sena minister @advanilparab ji
Being a local MLA, why was I not invited as per protocol. Are we going to play politics over vaccines too?@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @mybmc pic.twitter.com/atgPN0mzrv— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) May 7, 2021
मुंबईतील लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस न घेताच परतावं लागत आहे. त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत आहे. अशावेळी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत नवे लसीकरण केंद्र सुरु करण्यााबाबत आपण महापालिका आयुक्तांशी बोललो आहोत. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेच मुंबईत तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वांद्रे पूर्व इथल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी मुंबईमध्ये 3 नवे लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. त्यात,
1. माँसाहेब मिनाताई ठाकरे मॅटर्निटी होम, चुनाभट्टी
2. PWD कम्युनिटी हॉल, वांद्रे
3. MCMG पार्किंग, वर्ल्ड टॉवर, लोअर परळ
१८-४४ वयोगटातील नागरिकांसाठी ३ अतिरिक्त लसीकरण केंद्रं:
मासाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी
पीडब्ल्यूडी कम्युनिटी हॉल, वांद्रे पूर्व
बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग, वर्ल्ड टॉवर, लोअर परेल#YoungAndVaccinated#MyBMCVaccinationUpdate https://t.co/DNmLsFadig
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 6, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण
Congress MLA Zeeshan Siddiqui unhappy on inauguration of new corona vaccination center in Bandra East