मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी केली जात आहे. त्यानंतर गेल्या 5 डिसेंबरपासून सायन रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Corona vaccine test at Sion Hospital)
नुकतंच भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ लसी राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाली होती. त्यानंतर ‘कोवॅक्सिन’ लसीच्या चाचणीला सायन रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी दिली.
चीनच्या हुवांग प्रांतातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा म्हणून जगभरातील देशांमधून लसीचा शोध लावला जात आहे. अमेरिकामधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोव्हीशिल्ड’ लसीचा शोध लावला आहे. सध्या त्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे.
या लसीच्या चाचणीदरम्यान त्याचा मानवावर काही दुष्परिणाम होतात का? याचा सध्या अभ्यास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात त्याची चाचणी केली जात आहे. एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. (Corona vaccine test at Sion Hospital)
सायन रुग्णालयात 1 हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. दरम्यान शनिवारी 5 डिसेंबरपासून आतापर्यंत 15 स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
भारत बायोटीकची कोवॅक्सिन ही लस दिल्यावर त्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळी त्या स्वयंसेवकावर देखरेख ठेवण्यात येते. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास त्यांना घरी पाठवण्यात येते. स्वयंसेवक घरी गेल्यानंतरही डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले.
दरम्यान, भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सीन लस देण्याआधी स्वयंसेवकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच लस देण्याआधी लसीबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. यानंतर तो स्वयंसेवक तयार झाल्यास त्याची सही घेत लस दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. (Corona vaccine test at Sion Hospital)
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश https://t.co/492JboTWZj @PMOIndia @narendramodi @CMOMaharashtra #CoronaVaccine #coronavirus #SupremeCourt
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
संबंधित बातम्या :
मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?
आता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना दिलासा