मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील काही भागात रुग्ण दुप्पटीचा वेग शंभर दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईतील एच पूर्व आणि एफ उत्तर या दोन विभागात कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 100 दिवसांवर पोहोचला आहे. यात वांद्रे पूर्व, वडाळा, माटुंगा या भागांचा समावेश आहे. (Mumbai Corona Growth Rate Decreasing)
मुंबईतील वांद्रे पूर्व, माटुंगा, वडाळा या भागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांवर पोहोचला आहे. तर याव्यतिरिक्त इतर 8 विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने अर्धशतक गाठले आहे. विशेष म्हणजे या विभागातील रुग्ण दुप्पटीचा कालावधी देशात सर्वाधिक आहे.
कोविड प्रतिबंधासाठी महापलिकेने सातत्याने राबविलेल्या सर्वस्तरीय उपाययोजना आणि त्या उपाययोजनांना मिळालेली नागरिकांची अत्यंत मोलाची परिणामकारक साथ यामुळेच हे शक्य झाल्याचे पालिकेचे म्हणणं आहे.
शतक गाठणारे विभाग
अर्धशतक गाठणारे विभाग
1. ‘एम पूर्व’ विभाग (मानखुर्द – गोवंडी) – 79 दिवस
2. ‘इ’ विभाग (भायखळा) – 77 दिवस
3. ‘एल’ विभाग (कुर्ला) – 73 दिवस
4. ‘बी’ विभाग (सॅंडहर्स्ट रोड) – 71 दिवस
5. ‘ए’ विभाग (कुलाबा – फोर्ट) विभाग – 70 दिवस
6. ‘एम पश्चिम’ (चेंबूर) – 61 दिवस
7. ‘जी उत्तर’ (दादर) – 61 दिवस
8. ‘जी दक्षिण’ (वरळी – प्रभादेवी) परिसर – 56 दिवस
(Mumbai Corona Growth Rate Decreasing)
VIDEO : Central Team in Mumbai | केंद्रीय आरोग्य पथकाकडून महाराष्ट्राचे कौतुक : एकनाथ शिंदेhttps://t.co/xGh9uNxtaq
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 27, 2020
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 5318 नवे कोरोनाबाधित, तर 4430 रुग्णांची कोरोनावर मात