मुंबईला कोरोनाचा विळखा, वरळीनंतर दादर-माहिम-धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढतेच

| Updated on: Apr 15, 2020 | 12:11 PM

आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वाधिक 1 हजार 774 रुग्ण आढळले (Mumbai Corona virus Patient) आहेत.

मुंबईला कोरोनाचा विळखा, वरळीनंतर दादर-माहिम-धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढतेच
Follow us on

मुंबई : मुंबईला कोरोनाचा विळखा सातत्याने वाढताना दिसत (Mumbai Corona virus Patient) आहे. मुंबईत वरळीनंतर आता दादर, धारावी, माहिम परिसरातील रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज दादरमध्ये 2, धारावीत 5, माहिममध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंबईतील भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मुंबईत आज (15 एप्रिल) 18 रुग्णांची वाढ झाली आहे.

दादर-माहिम-धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढतेच

मुंबईतील दादरमध्ये कोरोनाचे रुग्ण हे सतत वाढत (Mumbai Corona virus Patient) आहेत. आज दादरमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण वाढले आहेत. हे दोन्ही रुग्ण दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आहेत. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 21 वर गेली आहे. तर माहिमच्या प्रकाश नगरमध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माहिममधील करोना रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे.

तर दुसरीकडे धारावी झोपडपट्टीभागात कोरोनाचे 5 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. धारावीत आतापर्यंत 7 जणांचा कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 60 वर पोहोचली आहे.

भाटिया रुग्णालयात 10 कर्मचाऱ्यांना कोरोना

त्याशिवाय मुंबईतील भाटिया रुग्णालयात दहा नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. हे सर्व भाटिया रुग्णालयातील कर्मचारी आहेत. काल (14 एप्रिल) पर्यंत भाटिया रुग्णालयातील 25 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता 10 नवे रुग्ण आढळल्याने भाटियातील कोरोना रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 702‬ वर पोहोचली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वाधिक 1 हजार 774 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 178 कोरोनाबळी गेले आहेत. यात मुंबईत 112 जणांचा कोरोनामुळे जीव गेला (Mumbai Corona virus Patient) आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या : 

नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मात

धक्कादायक! नागपुरात थेट मेडिकल स्टोअर्सधून दारुची विक्री

हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर