मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णांची आकडेवारीतून ही बाब निदर्शनास येत आहे. (Mumbai Corona Patient rate decreasing)
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढलेला पाहायला मिळत होता. यामुळे रुग्णवाढीचा कालावधी हा सुद्धा कमी झालेला पाहायला मिळाला. पण आता पुन्हा एकदा मुंबई शहरात कोरोना रुग्णवाढीचा कालावधी हा तीन महिन्यावर आलेला पाहायला मिळतो आहे.
काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे 2000 हून अधिक रुग्ण मिळत होते. पण आता हे आकडे कमी झालेले पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात वाढलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.
मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधीत वाढ
10 ऑक्टोबर – 69 दिवस
11 ऑक्टोबर – 69 दिवस
12 ऑक्टोबर – 71 दिवस
13 ऑक्टोबर – 73 दिवस
14 ऑक्टोबर – 77 दिवस
15 ऑक्टोबर – 82 दिवस
16 ऑक्टोबर – 86 दिवस
17 ऑक्टोबर – 90 दिवस
18 ऑक्टोबर – 95 दिवस
कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर कमी
10 ऑक्टोबर – 1.01 टक्के
11 ऑक्टोबर – 1.00 टक्के
12 ऑक्टोबर – 0.98 टक्के
13 ऑक्टोबर – 0.95 टक्के
14 ऑक्टोबर – 0.90 टक्के
15 ऑक्टोबर – 0.85 टक्के
16 ऑक्टोबर – 0.81 टक्के
17 ऑक्टोबर – 0.77 टक्के
18 ऑक्टोबर – 0.73 टक्के (Mumbai Corona Patient rate decreasing)
संबंधित बातम्या :
वेग मंदावला! राज्यात 5,984 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तब्बल 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी