मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

| Updated on: Apr 03, 2020 | 3:05 PM

पवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या 'कोरोना' चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (Corona Patient in Powai Slums)

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत कोरोना रुग्ण
Follow us on

मुंबई : मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वरळी कोळीवाडा आणि धारावीनंतर आता पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानंतर पवई झोपडपट्टीतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे. (Corona Patient in Powai Slums)

पवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण झोपडपट्टीच सील करण्यात आली आहे. इथे संचार करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. पंचशीलनगरमध्ये क्वारंटाईन झोन करण्यात आला आहे.

मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा काल ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

वरळी आणि धारावी- ‘कोरोना’चा फटका

वरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. या वृत्तामुळे वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.

वरळी कोळीवाडा परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Corona Patient in Powai Slums)

PHOTO | ‘कोरोना’विषयी जनजागृतीसाठी मुंबईतील रस्त्यावर अनोखा संदेश

मुंबईच्या धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण मिळाला. 35 वर्षीय डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णापासून डॉक्टरला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.

डॉक्टरच्या कुटुंबालाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तो राहत असलेली इमारतही मुंबई महापालिकेने सील केली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध सुरु आहे.

हेही वाचा : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण

वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात काल दिवसभरात 88 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 54 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 235 झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 24 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहेत. मुंबईत काल दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या :

कोळीवाड्यानंतर आता वरळी पोलीस कॅम्पात कोरोनाचा शिरकाव

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

चेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट, पतीचा आरोप

वरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं

मुंबईत 65 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू, मालवणी परिसर बीएमसी-पोलिसांकडून सील

मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, नोकरही बाधित

वरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील, कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव

‘कोरोना’च्या धोक्यामुळे दादा-वहिनी घरीच थांबा, आक्षेप घेतल्याने मुंबईत भावाचीच हत्या

(Corona Patient in Powai Slums)