मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बरेच नागरिक इंटरनेटचा (Mumbai Cyber Cell Alert To People) वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट, वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे (Mumbai Cyber Cell Alert To People).
सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. यामधील सायबर भामटे लोकांच्या याच सवयीचा फायदा घेत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते, तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे malware डाऊनलोड होते. ते तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यानां पाठवते. त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करत असतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करु शकतात (Mumbai Cyber Cell Alert To People).
अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा, असं आवाहन महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना केलं आहे. जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाऊनलोड केली असेल आणि ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी मागत असेल, तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा. शक्यतो अधिकृत आणि खात्रीलायक वेबसाईटवरुनच चित्रपट किंवा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा. तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये लेटेस्ट अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.
केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी जे नियम आणि आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा आणि गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असंही आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे (Mumbai Cyber Cell Alert To People).
Corona | मुंबईत विनामास्क फिरल्यास 1 हजार रुपये दंड, पालिकेचा निर्णयhttps://t.co/tnPItpH0Gz #MumbaiFightsCovid19 #Mumbai @mybmc
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
संबंधित बातम्या :
मुंबईत नाईट शिफ्टच्या शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड, वॉर्डबॉय अटकेत
Deonar Abattoir | मुंबईकरांची मटणाची चिंता मिटली, देवनार पशुवधगृह पुन्हा उघडणार