Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदेगटाचा दसरा मेळावा; तयारी अंतिम टप्प्यात

| Updated on: Oct 23, 2023 | 11:00 AM

Shivsena Dasara Melava 2023 : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दसरा मेळाव्याला अवघे काही तासच उरले आहेत. अशात या सगश्याचा लोकांची आसनव्यवस्था कशी असेल?

Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदेगटाचा दसरा मेळावा; तयारी अंतिम टप्प्यात
Mumbai Dadar Shivaji Park Shivsena Dasara Melava 2023 UDdhav Thackeray CM Eknath Shinde Marathi News
Follow us on

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 23 ऑक्टोबर 2033 : उद्या दसऱ्याचा सण आहे… दसऱ्याच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा या राजधानी मुंबईकडे असतात. कारण दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा पार पडतो. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे राज्याचं लक्ष असतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. उद्याच्या या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष आहे. या मेळाव्यांची तयारी आली आहे.

शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. काही खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खुर्च्यांवर शिवसेनेचे नेते उपनेते आणि पदाधिकारी बसतील. तर त्यामागे शिवसैनिकांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळे कंपार्टमेंट त्यासाठी तयार करण्यात आले आहे. महिलांना बसण्यासाठी स्टेजच्या समोर विशेष व्यवस्था असेल. तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

आझाद मैदानावर जय्यत तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दोन लाख लोक येणार असल्याचा अंदाज व्यक्त आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरील मेळाव्यापेक्षाही विशाल आणि यशस्वी व्हावा, यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे.

आझाद मैदानावरील रामलीला कार्यक्रमाचा मेळाव्यात अडसर निर्माण होत असल्याने त्यांनी स्वतःला ही रामलीला आज नवमीला इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतलाय. या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने आपली रणनीती आखली आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील मंत्री आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुखाला गर्दीच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.