मुंबई : मुंबईत सध्या पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. अश्यात जर तुम्ही दादर (Dadar) मार्केटमध्ये खरेदीसाठी जाणार असाल, तर तुमची गाडी नेमकी कुठे लावायची हा प्रश्न आ वासून उभा राहातो. पण सध्या मुबंई महापालिकेने यावर एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे. तुमची कार तुम्ही अगदी ऐन बाजारपेठेत पार्क करू शकणार आहात. शिवसेना भवनच्या शेजारी असणाऱ्या कोहिनूर स्वेअरमध्ये (Kohinoor Square) आता तुम्हाला कार पार्क करता येणार आहे. तसंच प्लाझा थिएटरमध्येही (Plaza Cinema) तुम्ही तुमची कार पार्क करू शकता.
तुमची कार तुम्ही अगदी ऐन बाजारपेठेत पार्क करू शकणार आहात. शिवसेना भवनच्या शेजारी असणाऱ्या कोहिनूर स्वेअरमध्ये आता तुम्हाला कार पार्क करता येणार आहे. तसंच प्लाझा थिएटरमध्येही तुम्ही तुमची कार पार्क करू शकता. मुंबई महापालिका आणि दादर व्यापारी संघाने एकत्र येत हा निर्णय घेतलाय.
दादरमध्ये खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना आपली गाडी पार्क कुठे करावी हा प्रश्न पडतो. त्यावर आता उपाय शोधण्यात आला आहे.दादरमध्ये वॉलेट कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत तुम्ही शिवसेना भवनच्या शेजारी असलेल्या कोहिनूर स्वेअरमध्येही तुमची कार पार्क करू शकता. या शिवाय प्लाझा सिनेमाघरातही ही सुविधा उपलब्ध आहे. तिथेही तुम्ही तुमची कार पार्क करू शकता.
ऐन बाजार पेठेत पालिका आणि व्यापारी संघाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वॉलेट पार्किंगसाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. सुरूवातीला तुम्हाला 100 रूपये द्यावे लागतील. ते पहिल्या तासासाठीच्या पार्किंगसाठी अआसेल. तर त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी 25 रूपये मोजावे लागणार आहेत.