दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी राज्यातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

| Updated on: Jan 10, 2024 | 10:17 AM

Deepak Kesarkar Meets Raj Thackeray on Shivtirth : आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. या निकालाआधी राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली होत आहेत. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर केसरकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी राज्यातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागतोय. त्याआधी राज्यातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थान जात केसरकर यांनी ही भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

केसरकर-राज ठाकरे भेट

केसरकर आणि राज ठाकरे यांची वीस दिवसांपूर्वीच ठरली बैठक ठरली होती. या बैठकीमध्ये मुंबई शहरातील सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर जरी चर्चा होत असली तरी आज शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे 16 आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचीही सूत्रांकडून मिळाली आहे.

राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर केसरकर काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्यासोबत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज साहेब एक वेगळा व्यक्तिमत्व आहे. ज्या रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यासारखे असंख्य क्रिकेटर घडवले त्यांची एक छोटीशी आठवण शिवाजी पार्क मैदानावर असावी. या ठिकाणी अनेक लहान लहान मुले क्रिकेट खेळायला येतात आणि त्यातूनच क्रिकेटर घडवला जातो. लवकरच पालकमंत्री म्हणून मिटिंग घेऊन त्याला मान्यता देईल आणि मैदानावर अतिक्रमण होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंना सांगितलं असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

केसरकर सिद्धिविनायकाच्या चरणी

राज ठाकरे यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी सिद्धीविनायक मंदिरात जात दर्शन घेतलं. मी दरवेळी इथे येतो आजही आलोय. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. जे रोज रोज वायफळ बडबड करतात त्यांचं तोंड लवकर बंद होवो अशी प्रार्थना केलीये. विजय सत्याचा होईल, आमचाच होईल, असं केसरकर म्हणालेत.

वेळ काढू पण ते करतात मला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु आरक्षणासंदर्भात कोर्टात कोण गेलं जागा संदर्भात कोर्टात कोण गेलं. नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगाळले असं आपणच म्हणायचं. तसं प्रत्येक बाबतीत हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे ऑफिसिअल चॅनल आहे त्याच्यामधून न जाता वेगळेच काहीतरी करायचं जे आपल्या सोयीस्कर असेल, असंही दीपक केसरकर म्हणाले.