मुंबईत आज एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील विक्रोळी भागात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात एका रुग्णाने स्वच्छतागृहात गळफास घेत जीवन संपवलं. विक्रोळीतील टागोर नगरमध्ये असलेल्या क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात ही घटना घडली आहे. गौरव भोसले या तरूणाने महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात स्वत: चं जीवन संपवलं. या घटनेने विक्रोळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागच्या तीन दिवसांपासून गौरव हा रूग्णालयात होता. आज त्याने त्याचं जीवन संपवलं. यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दु :खाचा डोंगर कोसळला आहे.
गौरव भोसले हा तरूण 26 तारखेला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला. गौरव भोसले याचं वय 38 वर्षे आहे. या तरुणाने आज पहाटे रुग्णालयाच्या स्वच्छालयात गळफास घेऊन स्वत: चं जीवन संपवलं. गौरव भोसले वय वर्ष 38 हा विक्रोळी टागोर नगरमधील रहिवाशी आहे. त्याला अशक्तपणा आणि लूज मोशन होत असल्याने 26 जूनला विक्रोळी टागोरनगरमधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. आज त्याने स्वत:चं जीवन संपवलं आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज पहाटे गौरव हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये बराच वेळ दिसला नाही. त्याची शोधा शोध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी रुग्णालयाच्या स्वच्छालयात गौरव भोसले या गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत कर्मचाऱ्यांना आढळून आला. याची तात्काळ माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी विक्रोळी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.
सकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस रुग्णालयात दाखल झाले. गौरवचा मृतदेह ताब्यात घेतला आणि अंतिम क्रियेसाठी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. गौरवने आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. विक्रोळी पोलिस ठाणे याचा तपास करत आहे.