मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये पाच वर्षांचा चिमुरडा नाल्यात पडल्याची घटना समोर आली आहे. भावासोबत खेळताना हुसैन हमीद शेख पाय घसरुन नाल्यात पडल्याची माहिती आहे. सावित्रीबाई फुले नगर परिसरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. (Mumbai Ghatkopar Boy falls in Nullah)
पाच वर्षांचा हुसैन आपल्या मोठ्या भावासोबत घराशेजारी असलेल्या नाल्याजवळ खेळत होता. खेळत असतानाच हुसैनचा पाय घसरला आणि तो नाल्यात पडला, अशी माहिती त्याच्या भावाने आपल्या आईला दिली.
मुलगा नाल्यात पडल्याचं समजताच हुसैनची आई धावत तिथे आली. आईने मुलाला शोधण्याचा अतोनात प्रयत्न केला, मात्र तो नाल्यात सापडला नाही.
मुंबईत घाटकोपरमध्ये पाच वर्षांचा चिमुरडा नाल्यात पडला, बचावकार्य सुरु pic.twitter.com/UoZ4OXau65
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2020
सध्या मुंबई पोलिस आणि अग्निशमन दल नाल्यात बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नाल्याची साफसफाई झालेली असल्याने तो वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला, बीडच्या कुुटुंबावर दुःखाचा डोंगर
पालकांचं दुर्लक्ष झाल्याने लहान मुलं नाल्यात पडल्याच्या घटना याआधीही अनेक वेळा समोर आल्या आहेत. पावसाळ्यात उघड्या गटारात किंवा नाल्यात बालके पडण्याच्या घटना वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे घराशेजारी खेळणाऱ्या मुलांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. (Mumbai Ghatkopar Boy falls in Nullah)