मुंबई – गोवा वंदेभारतचे तिकीट विमानपेक्षा महाग…तरीही गणपतीची बुकींग झाली फुल

| Updated on: Jun 28, 2023 | 2:33 PM

27 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकातून एका सोहळ्यात देशातील विविध भागातून धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला.

मुंबई - गोवा वंदेभारतचे तिकीट विमानपेक्षा महाग...तरीही गणपतीची बुकींग झाली फुल
VANDE BHARAT
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी कालच देशभरातील पाच वंदेभारत एक्सप्रेसना एकाच वेळी हिरवा झेंडा दाखविला. त्यात सीएसएमटी – मुंबई ते गोवा ( मडगाव ) ( Csmt to Madgaon Vandebharat Express )  वंदेभारत एक्सप्रेसचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांबरोबरच आता गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांचा देखील फायदा होणार आहे. आता कोकणात गणपतीला ( Ganpati Festival Konkan ) जाणाऱ्या चाकरमान्यांनी देखील वंदेभारतची तिकीटे महाग असून ती बुक केली आहेत.

मुंबईला पाचवी वंदेभारत एक्सप्रेस मिळाली आहे. याआधी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते बिलासपूर, मुंबई ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा वंदेभारत धावत आहेत. परंतू मुंबई ते गोवा वंदेभारतचा प्रवास महागडा असून मुंबई ते गोवा जाण्यासाठी मान्सून वेळापत्रकामुळे दहा तास लागणार आहेत. वंदेभारतने गोवा जाण्यासाठी नॉन मान्सून काळात एक तासांची बचत होईल असा दावा केला जात आहे.

27 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकातून एका सोहळ्यात देशातील विविध भागातून धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. या सोहळ्यात मुंबई ते गोवा वंदेभारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखविला, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यापेक्षा या ट्रेनला गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी चालविण्यात येत आहे. या वंदेभारतचे तिकीट विमानाच्या तिकीटाहून अधिक आहे.

सध्या दहा तासांचा प्रवास 

सीएसएमटी ते गोवा ( मडगाव ) स्थानकाचे अंतर 586 किमी असून त्यासाठी 11 ते 12 तासांचा कालावधी याआधी लागत होता. आता वंदेभारत एक्सप्रेस हे अंतर 8 तासांत कापले जाणार आहे. परंतू मान्सून वेळापत्रकामुळे या प्रवासाला दहा तास लागत आहेत. ही ट्रेन मान्सूनमुळे आठवड्यातून तीन वेळा चालविण्यात येत आहे. मान्सून नंतर ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. या दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम असे थांबे मिळाले आहेत.

विमानापेक्षा जादा भाडे

वंदेभारत ट्रेनचे भाडे विमानाप्रवासापेक्षा अधिक आहे. ट्रेनचे चेअर कारचे भाडे 1435 रुपये आहे. तर एक्झुकेटीव्ह क्लासचे भाडे 2,495 रुपये आहे. तर हवाई प्रवासाला इंडीगोचे भाडे 2,024 रुपये, आकासा एअर 2,077, स्पाईस जेट 2,154, एअर इंडीया 2,140 रूपये इतके आहे. अन्य एअरलाईन्स भाडे ही जवळपास इतकेच आहे. विमानाचे भाडेही गर्दीच्या पिक सिझनमध्ये याहून अधिक असते. मुंबई ते गोवा या मार्गावरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी वंदेभारतच्या या महागड्या तिकीटाकडे पर्यटक डोळेझाक करुन ते खरेदी करीत आहेत.

गणपतीचे तिकीट फुल

वंदेभारत गाडीचे चेअरकारचे कणकवलीपर्यंतचे भाडे 1,365 रूपये आहे. त्यामध्ये 157 रूपये कॅटरिंगचे लावले आहेत. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला असल्याने 18 आणि 19 सप्टेंबरचे तिकीट फुल झाले असून वेटींग लिस्ट लागली आहे. मान्सूनमध्ये वंदेभारत आठवड्यातून तीनवेळाच धावत असल्याने बुकींगला जास्त संधी मिळाली नसल्याचे बळीराम राणे यांनी सांगितले.