मुंबई : मुंबई आणि उपनगरात फेब्रुवारीच्या महिन्यात सूर्य (sun )आग ओकत आहे. त्यामुळे मुंबईचे ( mumbai ) किमान तापमानात खूपच वाढ झाली आहे. सोमवारचा दिवस फेब्रुवारी महिन्यातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. या सोमवारच्या तापमानाने गेल्या दोन वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. मुंबईत येत्या काही दिवसात अशाच प्रकारे तापमानात ( temperatures ) वाढ होण्याची चिन्हे वर्तविण्यात आली आहेत. अरबी समुद्रातील एंटी सायक्लोनिक सर्कुलेशनमुळे तापमानात ही वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. येत्या काही दिवसात मुंबईचे तापमान अशाच प्रकारे सामान्य तापमानाच्या चार ते पाच डिग्री पर्यंत वाढणार आहे.
उत्तर भारतात मात्र अजूनही थंडीचा माहोल कायम आहे. त्याच्या उलट मुंबईचे तापमान वाढत चालले आहे. मुंबईत रात्रीचे तापमानही वाढले आहे. सोमवारी मुंबईचे तापमान 37.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. साल 2019 नंतरचे हे फेब्रुवारी महिन्यातील दुसरे सर्वाधिक नोंदवलेले गेलेले तापमान आहे. अलिकडच्या वर्षातील हे सर्वाधिक तापमान मानले जात आहे. दोन वर्षांपूर्वी 2021 सालातील फेब्रुवारी महीन्यातील कमाल तापमान 36.3 डीग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले होते. गेली तीन दिवस तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वरच आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीतील उच्चांकी तापमान 12 फेब्रुवारी रोजी 34.8 डिग्री नोंदले गेले होते.
अरबी समुद्रातील बदलल्या परिस्थितीमुळे एण्टी सायक्लोनिक सर्कुलेशन सिस्टीम तयार झाली आहे. त्याच्या प्रभावामुळे मुंबईचे तापमान वाढत चालले आहे. येत्या काळात मुंबईचे तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांना स्वताची काळजी घ्यावी, उन्हात फिरू नये आणि फिरायचे असेल तर सोबत पाण्याची बॉटली तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगलचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पूर्वेकडील वारे आणि स्वच्छ आकाशामुळे तापमानात वाढ होत चालली आहे. सकाळचे वातावरण आल्हाददायक वाटत असले तरी दुपारी पारा चढत जातो. समुद्रातील अॅण्टी सायक्लॉन स्थिती यंदा दहा दिवसांआधीच निर्माण झाली आहे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.