मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध भागात रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. (Mumbai Heavy Rain Alert)
Mumbai Rain Live Updates
[svt-event title=”गोरेगावमध्ये नागरिकांच्या घरात पाणी” date=”04/08/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ]
A home in Goregaon West. In the past 3 hours, very heavy showers lashed Kandivali West, Borivali, Goregaon, Mira Bhayandar and nearby locations recorded over 100mm rain. #mumbairain #MumbaiRains #MumbaiRainWithSkymet @MumbaiRainApp https://t.co/y332mFoY7a
— SkymetWeather (@SkymetWeather) August 4, 2020
9.30 am – ठाणे : घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावरील इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून एकाचा मृत्यू
9.15 am – दादर-प्रभादेवी भागात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक बंद, केवळ विरार-अंधेरी-वांद्रे लोकल वाहतूक सुरु
Due to high tide & heavy rains resulting in water logging at Dadar & Prabhadevi, special suburban services are being run between Virar-Andheri-Bandra & suspended between Bandra – Churchgate: Western Railway #MumbaiRain
— ANI (@ANI) August 4, 2020
[svt-event title=”चेंबूरमधील रस्त्याला नदीचे स्वरुप” date=”04/08/2020,8:58AM” class=”svt-cd-green” ]
मुंबई : जोरदार पावसामुळे चेंबूरमधील रस्त्याला नदीचे स्वरुप, रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले #MumbaiRains #Chembur pic.twitter.com/mDz8TCXFwd
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 4, 2020
मुंबई लोकल : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सूचना
पश्चिम रेल्वे – पूर्णपणे ठप्प
हार्बर रेल्वे – कुर्ला ते सीएसएमटी बंद
मध्य रेल्वे – धीम्या गतीने
Western line completely stopped & harbour line stopped between Kurla & Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT); central line is running with slow speed: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #MumbaiRain
— ANI (@ANI) August 4, 2020
मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कुर्ला – नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गोरेगावमध्ये मोतीलाल नगरात रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं.
नवी मुंबईत पहाटेपासून पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील वाशी, एपीएमसी, माफको मार्केट, ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरुळ या भागात रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
मुंबईतील पावसाची आकडेवारी (पहाटे सहा वाजेपर्यंत)
मुंबई शहर – 230.06 मिमी
मुंबई पूर्व उपनगर – 162.83 मिमी
मुंबई पश्चिम उपनगर – 162.28 मिमी
पाहा व्हिडिओ :
अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व @Indiametdept ने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 4, 2020
मुंबईसह उपनगरात आज (4 ऑगस्ट) आणि उद्या (5 ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
संबंधित बातम्या :
देशात कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु, DGCI कडून परवानगी