मुंबई : ‘कोरोना’पाठोपाठ चक्रीवादळाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना पावसाळ्यातही सतर्क राहावे लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. या काळात 4.5 मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत. मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची ‘तुंबापुरी’ होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे. (Mumbai High Tide Timing in Rains)
जूनमधील उधाणाचे दिवस
गुरुवार 4 जून (सकाळी 10.57) – लाटांची उंची 4.56 मीटर
शुक्रवार 5 जून (सकाळी 11.45) – लाटांची उंची 4.75 मीटर
शनिवार 6 जून (दुपारी 12.33) – लाटांची उंची 4.82 मीटर
रविवार 7 जून (दुपारी 1.19) – लाटांची उंची 4.78 मीटर
सोमवार 8 जून (दुपारी 2.04 ) – लाटांची उंची 4.67 मीटर
मंगळवार 9 जून (दुपारी 2.48) – लाटांची उंची 4.5 मीटर
मंगळवार 23 जून (दुपारी 1.43) – लाटांची उंची 4.52 मीटर
बुधवार 24 जून (दुपारी 2.25) – लाटांची उंची 4.51 मीटर
जुलैमधील उधाणाचे दिवस
शनिवार 4 जुलै (सकाळी 11.38) – लाटांची उंची 4.57 मीटर
रविवार 5 जुलै (दुपारी 12.23) – लाटांची उंची 4.63 मीटर.
सोमवार 6 जुलै (दुपारी 1.06) – लाटांची उंची 4.62 मीटर
मंगळवार 7 जुलै (दुपारी 1.46) – लाटांची उंची 4.54 मीटर
मंगळवार 21 जुलै (दुपारी 12.43) – लाटांची उंची 4.54 मीटर
बुधवार 22 जुलै (दुपारी 1.22) – लाटांची उंची 4.63 मीटर
गुरुवार 23 जुलै (दुपारी 2.03) – लाटांची उंची 4.66 मीटर
शुक्रवार 24 जुलै (दुपारी 2.45) – लाटांची उंची 4.61 मीटर
(Mumbai High Tide Timing in Rains)
ऑगस्टमधील उधाणाचे दिवस
बुधवार 19 ऑगस्ट (दुपारी 12.17) लाटांची उंची 4.61 मीटर
गुरुवार 20 ऑगस्ट (दुपारी 12.55) -लाटांची उंची 4.73 मीटर
शुक्रवार 21 ऑगस्ट (दुपारी 1.33) -लाटांची उंची 4.75 मीटर
शनिवार 22 ऑगस्ट (दुपारी 2.14)- लाटांची उंची 4.67 मीटर
सप्टेंबर महिन्यात उधाणाचे दिवस
गुरुवार 17 सप्टेंबर (दुपारी 11.47) – लाटांची उंची 4.6 मीटर
शुक्रवार 18 सप्टेंबर (दुपारी 12.24) – लाटांची उंची 4.77 मीटर
शनिवार 19 सप्टेंबर (रात्री 00.45) – लाटांची उंची 4.68 मीटर
शनिवार 19 सप्टेंबर (दुपारी 13.01) – लाटांची उंची 4.78 मीटर
रविवार 20 सप्टेंबर (रात्री 01.29) – लाटांची उंची 4.78 मीटर
रविवार 20 सप्टेंबर दुपारी 13.40) – लाटांची उंची 4.62 मीटर
सोमवार 21 सप्टेंबर (रात्री 02.15) – लाटांची उंची 4.68 मीटर
संभाव्य चक्रीवादळ व मॉन्सून तयारीच्या अनुषंगाने, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी @mybmcWardGS मधील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन व परिसराला भेट देऊन पाहणी केली. #BMCNisargaUpdates#AtMumbaisService#AnythingForMumbai pic.twitter.com/qUcBS9G1oy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 3, 2020