महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने ऐन हिवाळ्यात पारा चढला आहे. राज्यात बटोगे तो कटोगे आणि एक है तो सेफ है या दोन नव्या घोषणांनी धुमाकूळ घातला आहे. या दोन घोषणांनी राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या ध्रुवीकरणावर ताशेरे ओढले आहे. हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरणाचा फायदा लाटण्यासाठीच हा डाव टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे. ऐन निवडणुकीत या मुद्दाने इतर मुद्दे मागे टाकले आहे. त्यातच मुंबईत हिंदूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे हा ताजा रिपोर्ट….
हिंदूची संख्या घटणार, काय सांगतो अहवाल
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (TISS) याविषयीचा एक अहवाल दिला आहे. त्यानुसार, मुंबईत हिंदूंची संख्या 88 ते 66 टक्क्यांवर आली आहे. या अहवालानुसार, 1961 मध्ये मुंबईत हिंदूची संख्या 88 टक्के होती. ती 2011 मध्ये 66 टक्क्यांपर्यंत खाली घसरली. तर या 50 वर्षांत हिंदूंच्या संख्येत केवळ 8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर 1961 मध्ये मुस्लिम लोकसंख्या केवळ 8 टक्के होती.
2011 पर्यंत ही लोकसंख्या 21 टक्के इतकी झाली आहे. TISS च्या लोकसंख्येच्या अभ्यासानुसार, लोकसंख्येचे हे गुणोत्तर प्रमाण असेच राहिले तर येत्या 40 वर्षांत म्हणजे 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांहून अधिकने कमी होण्याची भीती आहे. तर मुस्लिम लोकसंख्या जवळपास 30 टक्क्यांहून अधिकने वाढण्याची शक्यता आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्याचा मोठा धोका
मुंबईत 50 टक्के अवैध घुसखोरी ही महिलांच्या देह व्यापारातून होत असल्याचे समोर येत आहे. स्थानिक लोकांची नाराजी वाढत आहे. या अवैध प्रवाशांमुळे येथील राजकीय, सामाजिक वातावरणात मोठा बदल होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अवैध प्रवाशांमुळे लोकसंख्येचे गुणोत्तर प्रमाणच वाढले नाही तर सामाजिक आरोग्य पण धोक्यात आल्याचे समोर येत आहे. या मेट्रोपॉलिटन शहरात तणाव वाढत आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. एकगठ्ठा मतांसाठी या अवैध प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण पुढे येत आहे. एबीपीने याविषयीचे वृत्त दिले आहे.