मुंबई | 06 फेब्रुवारी 2024 : सर्वसामान्यांसाठी सरकारकडून काही योजना आखल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे लेक लाडकी योजना… 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना राज्यातील मुलींसाठी फायदेशीर ठरणार आहे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. टप्प्या टप्प्याने या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एक लाख एक हजार रूपये असं या योजनेचं स्वरूप आहे.
मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रूपये या कुटुंबाला मिळणार आहेत. ही मुलगी पहिलीला देली की सहा हजार रूपये मिळतील. सहावीत गेली की सात हजार रुपये मिळणार आहे. तसंच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जातील. ही मुलगी अकरावीत गेली ती आठ हजार रुपये दिले जातील. तर वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रूपये सरकारकडून दिले जातील.
1 एप्रिल 2023 या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखली आहेय पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते. ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. तसंच या कुटुंबाचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखांच्यावर नसावं.
तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, मुलीची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन तुम्ही हा अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तिचा जन्माचा दाखला,कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र, आधारकार्ड, पालकांचं आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशकार्डची झेरॉक्स, मचदरानकार्ड, शाळेचा दाखला ही कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.