पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. हे विधान कुणीही वैयक्तिक टीका म्हणून घेऊ नये, असं म्हटलं. पण पंतप्रधान एखादं विधान करतात आणि तेही निवडणूक काळात ते एखादं वक्तव्य करत असतील तर त्याचे राजकीय अर्थ काढले जाणं सहाजिक आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा सार अन् त्या विधानाच्या मागचा पुढचा भाग पाहिल्यानंतर ते विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच बाबत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलं, ते आत्मा एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याची गोष्ट करतो. त्यांना नेमकं काय म्हणायचं? जोपर्यंत शरद पवार मरत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र आपल्याला मिळणार नाही? ही त्यांच्या मनातली सल आहे. हे त्यांच्या मनाला सतावतंय? शरद पवारांच्या मृत्यूवर बोलणं, ही घाणेरडी भाषा आहे. ‘भटकती आत्मा’चा अर्थ काय होतो, हे भाजपने सांगावं. विशेष म्हणजे अजित पवारांनी याच्यावर उत्तर द्यावं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
असली शिवसेनेला नकली शिवसेना भाजपचे लोक समजतात. जमिनीवरचे कार्यकर्ते उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. केसेसला घाबरून पोरं घरी बसलेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना काही वेळ घरी बसवलं होतं. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने सगळे बाहेर पडले आहेत. कार्यकर्ते एकत्र यायला नाही, तर पांगायला सुरुवात झालेली आहे. पहाटेपासून कार्यकर्ते आलेत. ऊन वाढलंय. त्यांना विश्रांतीची आता थोडी गरज आहे. पण सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचावा म्हणून लोक एकत्र आलेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे की, शरद पवार उद्धव ठाकरे यांची लाट पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सर्व येऊन या ठिकाणी मोठमोठे सभा होतील. मशाल पेटवायची गरज नाही, मशाल पेटलेलीच आहे. लोकांच्या हक्काची ही लढाई आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.