कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 08 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना… पोलीस दलातील अत्यंत धक्कादायक बातमी… मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलातील अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. महिला पोलिसांच्या या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटेनेची सखोल चौकशी होणार आहे.
मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो, असं अमिष दाखवून महिलांचं शोषण केलं गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन या महिला पोलिसांवर अत्याचार केला गेल्याची माहिती आहे.
आठ महिला पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर बलात्कार झाल्याचं या महिला पोलिसांनी म्हटलं आहे. या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरु करण्यात आली आहे.
जिथे कायदा आणि सुव्यस्था राखली जाते. जिथे सामान्या नागरिकांचं संरक्षण केलं जातं त्याच पोलीस खात्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. ‘निर्भया पथक’ सारखी पथकं महिलांच्या संरक्षणासाठी रात्री गस्त घालतात. मात्र याच पोलीस दलातील महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याच कारण आहे. मुंबई पोलीस दलातील तब्बल आठ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे गंभीर आरोप लावालेत. महिला पोलिसांनी टाकलेल्या या ‘लेटर बॉम्ब’मुळे पोलीस दलातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.