मुंबई : कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Mumbai Local) यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं (Uddhav Thackeray Mumbai Local . मुंबईतील लोकल आणि बस सुरुच राहणार आहेत. मात्र मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, शक्य नसेल ती कार्यलये बंद करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मातोश्रीवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं.
लोकल रेल्वे सुरुच राहणार
संपर्क आणि संसर्ग टाळणे हे आपल्याला करावे लागणार आहे. रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहन्या आहेत. जर रेल्वे बंद केली तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आहेत, ते इच्छित स्थळी पोहोचणार नाहीत. त्यामुळे रेल्वे आणि बस सुरुच राहतील असं मुख्यमंत्री म्हणाले.
अत्यावश्यक सेवा पुरवणारा कर्माचारी काय करणार, आपली मोठी रुग्णालये, पालिका कर्मचारी आहेत यांची ने-आण कशी होणार, पाणी सोडणारे कसे येणार त्यामुळे या दोन सेवा सुरुच राहतील.
सरकारी कार्यालयात कर्माचारी 25 टक्के कर्मचारी
सरकारी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यावरुन 25 टक्क्यावर आणली आहे. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना जे शक्य नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
चार शहरातील दुकानं, ऑफिस 31 मार्चपर्यंत बंद
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व ऑफिस, दुकाने 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत, असा निर्णय आम्ही घेतला आहे. यामध्ये बँक चालू राहणार आहे. यापुढे आर्थिक संकट येणार आहे. याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. जी ऑफिस बंद होणार आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण संकटातून बाहेर पडणार आहे तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करु नका, ही माणुसकी सोडू नका. ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस आपण वापरत आहोत, ती कारणं आपण बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पहिली ते आठवी परीक्षा रद्द
महाराष्ट्रातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व परीक्षा तूर्तास रद्द, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतरhttps://t.co/lgvUan8QHE @VarshaEGaikwad @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2020
मुख्यमंत्र्यांचं निवेदन जसंच्या तसं
सध्या जगात अशी वेळ आलीय, जगण्यासाठी घरात थांबणं आवश्यक आहे. रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कोरोना विषयक चित्रपट मुख्यमंत्री कार्यालय ट्वीटरवर शेअर केला, जरूर पहा. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरून धवन, आयुषमान खुराणा, आलिया भट, विराट कोहली, सचिन तेंडुलकर
संपर्क टाळणे हे एकमेव शस्त्र. मात्र आपल्या काळजीपायी अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्र सरकार काही निर्णय घेत आहे. कदाचित आपल्याला रुचणार नाही
रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही
मुंबई MMRDA भाग, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, वैद्यकीय सुविधा, बँक या जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकानं बंद, सर्व कार्यालये बंद, ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, शक्य नसेल ती कार्यालये बंद, सरकारी कर्मचारीवर्ग २५ टक्के आणणार
सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे.
अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.
काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.
अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता. बँका सुरूच राहतील.
खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे.
या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात. ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.
पुढे आर्थिक संकट उद्भवेल, त्यावर मात करण्यासाठी अभ्यास गट. जे कर्मचारी घरी आहेत, त्यांचा पगार मालकांनी कापू नये, माणुसकी टिकवण्याची वेळ आहे
ही फिरण्याची सुट्टी नाही, सर्वांनी घरी बसून काळजी घ्यावी. काही लढाया रणांगणात लढाव्या लागतात, आपण घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे.
CM Uddhav Thackeray LIVE
आरोग्यमंत्र्यांचा इशारा
“मुंबईतील गर्दी कमी होतना दिसत नाही. काही ट्रेनमध्ये गर्दी आहे. त्यामुळे मोठे पाऊल उचलावे लागणार आहे. मुख्यमंत्री दुपारी साडेबारा वाजता सांगतील”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची आजची अपडेट माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचा तीन दिवसापूर्वी इशारा
“अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील. पण ती कठोर पाऊले उचलायची आमची इच्छा नाही. जनतेनं सहकार्य करावं”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसापूर्वी केलं होतं.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
संबंधित बातम्या
Corona positive | मुंबईतील 2 महिला, नगरमधील एकाला लागण
CM LIVE : घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका : मुख्यमंत्री