Mumbai Local | सात महिन्यांनी लेडीज डब्यात गजबज, घटस्थापनेला महिलांसाठी लोकलचे दार उघडणार

| Updated on: Oct 16, 2020 | 5:39 PM

महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही

Mumbai Local | सात महिन्यांनी लेडीज डब्यात गजबज, घटस्थापनेला महिलांसाठी लोकलचे दार उघडणार
Follow us on

मुंबई : तब्बल सात महिन्यांनी मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात पुन्हा एकदा गजबज ऐकायला मिळणार आहे. कारण घटस्थापनेला महिलांसाठी लोकलचे दार उघडणार आहे. राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. (Mumbai Local to reopen for women on first day of Navratri)

अनलॉकिंगदरम्यान सर्व काही सुरळीत होत असताना मुंबई लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलची वाहतूक 22 मार्चपासून बंद करण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा होती. जून महिन्यात टप्प्याटप्प्याने अधिक कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली.