Mumbai Local : एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली, प्रवाशी संतप्त

| Updated on: Aug 26, 2024 | 8:56 AM

सध्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Mumbai Local : एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली, प्रवाशी संतप्त
Follow us on

Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. कळवा रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व लोकल या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे लातूर एक्सप्रेस ही कळवा स्थानकात थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.

लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा

लातूर एक्सप्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर ती एक्सप्रेस रवाना होणार आहे. सध्या या एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे कल्याण, कर्जत या ठिकाणावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक कर्मचाऱ्यांचा लेटमार्क लागणार आहे. ऐन कामाच्या वेळी झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

मुंबईतील लाखो नागरिक हे सकाळी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. तर काही विद्यार्थी आपपल्या शाळा-कॉलेजला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.