LIVE | नागपूरात सीबीआयची कारवाई, 60 हजारांची लाच घेताना सहाय्यक कामगार आयुक्ताला बेड्या

| Updated on: Dec 31, 2020 | 6:18 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

LIVE | नागपूरात सीबीआयची कारवाई, 60 हजारांची लाच घेताना सहाय्यक कामगार आयुक्ताला बेड्या
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Dec 2020 07:15 PM (IST)

    शेतकरी आणि सरकारमधील सहावी बैठक तोडग्याविना संपली, 4 जानेवारीला पुन्हा बैठक

    केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील सहावी बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली आहे. आता पुढील बैठक 4 जानेवारीला होणार आहे.

  • 30 Dec 2020 06:33 PM (IST)

    ITR फाईल करण्याची मुदत वाढवण्याचा आयकर विभागाचा निर्णय

    2020-21 या असेसमेंट वर्षासाठी ITR फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.


  • 30 Dec 2020 06:15 PM (IST)

    पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम अद्यापही सुरु

    पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम अद्यापही सुरु, साडेपाच वाजता जेवढे उमेदवारी अर्ज टेबलवर होते त्यांचे अर्ज दाखल करून घेण्याचे काम सुरु

  • 30 Dec 2020 06:09 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेतली भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाबींची माहिती दिली. 2021 या नव्या वर्षासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. तर भारतीय लोकांच्या उज्ज्वल भविष्याचं आश्वासनही यावेळी मोदींनी दिलं.

  • 30 Dec 2020 05:36 PM (IST)

    धुळे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत बिनविरोध, शिवसेनेच्या हाती गेली सत्ता

    धुळे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत बिनविरोध, शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायत बिनविरोध, शिवसेनेच्या हाती गेली सत्ता, शाणा भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत बिनविरोध, गुलाल टाकून केला जल्लोष

  • 30 Dec 2020 05:21 PM (IST)

    मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, झालेल्या सगळ्या आरोपांचं केलं खंडन

    मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, झालेल्या सगळ्या आरोपांचं केलं खंडन, मी नार्को टेस्ट करायला तयार, महिलेच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण, पोलिसांनी शोध घ्यावा, जर काही केलं नसताना फक्त राजकीय द्वेषातून असे प्रकार व्हायला लागले तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत : मेहबूब शेख

  • 30 Dec 2020 05:06 PM (IST)

    विनायक मेटे यांची राज्य सरकावर टीका

    विनायक मेटे यांच्या भाषणाती मुद्दे

    – राज्य सरकारवर सर्व मराठा संघटनांनी एकत्र येऊन दडपण आणल पाहिजे

    – SEBC चं आरक्षण मिळाल्यावर EWS च्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, अस प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात देणं आवश्यक आहे

    – मुख्यमंत्र्यांकडून शिवसंग्रामच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा शब्द

    – आता नेमण्यात आलेल्या सिनिअर वकीलांसह आणखी किती वकील लावणार आहेत

    – राज्य शासनाने आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत मेगा नोकरी भरती थांबवावी

    – आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत

    – मुख्यमंत्री चार पाच दिवसात बैठक बोलवतील, त्या बैठकीला सर्व मराठा संघटनांनी एकत्र येऊन आमने सामने चर्चा करावी

    – जर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली नाही तर 9 जानेवारी औरंगाबादच्या शिवसंग्रामच्या राज्य कार्यकरणीच्या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाईल

    – सरकारने काही एजंट समाजात सोडले आहेत, ते समाजात गैरसमज पसरवत आहेत

  • 30 Dec 2020 04:53 PM (IST)

    मराठा आरक्षणाबद्दल सरकार कोणती रणनीती आखत आहे? – विनायक मेटे

    मराठा आरक्षण अबाधित रहावं व ते टिकाव यासाठी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. या सुनावणी बद्दल सरकार काय तयारी करत आहे, कोणती रणनीती आखत आहे विनायक मेटेंचा सवाल

    – राज्य सरकारवर सर्व मराठा संघटनांनी एकत्र येऊन दडपण आणल पाहिजे – विनायक मेटे

  • 30 Dec 2020 04:46 PM (IST)

    कोरोनाची लक्षण असल्याने एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी 14 दिवसांची दिली मुदत वाढ

    एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी 14 दिवसांची दिली मुदत वाढ,  एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाद्वारे दिली माहिती, कोरोनाची लक्षणे जानवल्यामुळे आज ईडीच्या चौकशीसाठी मुदत वाढीची खडसेंची मागणी मंजूर,

     

  • 30 Dec 2020 04:19 PM (IST)

    राष्ट्रवादीचा पदाधिकारी महेबुब शेखच्या विरोधात भाजप युवा मोर्चाची निदर्शने

    राष्ट्रवादीचा पदाधिकारी महेबूब शेखच्या विरोधात भाजप युवा मोर्चाची निदर्शने, ट्युशनचालक युवतीवरील बलात्कार प्रकरणी युवा मोर्चाची निदर्शने, निदर्शनासाठी भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते क्रांती चौकात दाखल, निदर्शनापूर्वी क्रांती चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, क्रांती चौकात युवा मोर्चाकडून पुतळे जाळले जाण्याची शक्यता, युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांची राहणार उपस्थिती

  • 30 Dec 2020 04:16 PM (IST)

    कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विज्ञान भवनात शेतकऱ्यांसोबत केलं जेवण

    दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि नरेंद्रसिंग तोमर यांनी विज्ञान भवनात शेतकऱ्यांसमवेत जेवण केलं. जिथे सरकार शेतकर्‍यांच्या शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करत आहे.

  • 30 Dec 2020 03:41 PM (IST)

    औरंगाबादच्या तहसील कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी तुफान गर्दी

    औरंगाबादमध्ये उमेदवारी अर्ज दखल करण्यासाठी तहसील कार्यालयात तुफान गर्दी झालीय. इच्छुक उमेदवारांची तहसीलदार कार्यालायात तुंबळ गर्दी पाहायला मिळत आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात गर्दी उसळली आहे. कोरोनाची भीती बाजूला सारून उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी झालीय. काही तहसीलदार कार्यालयांच्या आवारात पाय ठेवायलाही जागा नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

  • 30 Dec 2020 03:16 PM (IST)

    सीरम आणि ऑक्सफर्ड अ‌ॅस्ट्राजेनेकाच्या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता

    भारतामधील सीरम आणि Oxford Vaccine वर एक्स्पर्ट समितीची बैठक सुरू आहे. UK मध्ये वॅक्सिनला ला मंजुरी नंतर भारतमध्ये सीरम ने वॅक्सिनच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे.आज ऑक्सफर्ड आणि सीरमच्यालसीच्या वापराला परवानगी मिळू शकते.

  • 30 Dec 2020 03:09 PM (IST)

    रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी: राम शिंदे

    कर्जत जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी  रोहित पवार यांनी जाहीर केलेले बक्षीस आर्थिक प्रलोभन असल्याचा आरोप राम शिंदेंनी केला आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, दबाव तंत्र वापरणे, पैशाचा पैशाचा वापर करणे, हे गैर आहे, असेही राम शिंदे म्हणाले.

  • 30 Dec 2020 02:59 PM (IST)

    केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीची बैठक, सीरमच्या लसीला परवानगी देण्याविषयी चर्चा?

    केंद्र सरकारच्या औषध नियंत्रक संस्थेच्या तज्ज्ञ समितीची आज बैठक होत आहे. सीरम इनस्टिट्यूट इंडियाच्या लसीला परवानगी देण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • 30 Dec 2020 02:26 PM (IST)

    शेतकरी नेते केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी रवाना

    दिल्लीतील विज्ञान भवनात आज केंद्र सरकार आणि 40 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडत आहे. थोड्याचवेळात या बैठकीला सुरुवात होईल. त्यासाठी शेतकरी नेते विज्ञान भवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

  • 30 Dec 2020 02:19 PM (IST)

    अ‍ॅमेझॉन गोदामाच्या तोडफोडप्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांना जामीन

    अ‍ॅमेझॉन गोदामाच्या तोडफोडप्रकरणात बुधवारी अंधेरी न्यायालयाने मनसेच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला. पोलिसांनी मनसेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. या सगळ्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला.

  • 30 Dec 2020 01:47 PM (IST)

    थर्टी फस्ट पार्टीवर कल्याणमध्ये 6 ठिकाणी नाकाबंदी, सोसायट्यांच्या गच्चीवर पोलिसांची विशेष नजर

    मुंबई : कोरोना महामारीमुळे नववर्षाचे स्वात साध्या पद्धतीने करण्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर थर्टी फस्टची पार्टी करुन कोरोना आमंत्रण देऊ नका असे आवाहन कल्याण पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. सोसायटीच्या गच्चीवर पोलिसांची विशेष नजर असणार असून एकूण सहा ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. पोलिसांची 20 विशेष पथकं तळीरामांवर नजर ठेवणार आहेत.

  • 30 Dec 2020 01:03 PM (IST)

    मार्गशीष महिना असल्यामुळे कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये शुकशुकाट

    आज बुधवार आणि उद्या थर्टीफर्स्ट असतानाही कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये शुकशुकाट. मार्गशीर्ष महिना असल्याचा परिणाम. खवय्यांनी मटणाकडे पाठ फिरवल्याने व्यावसायिक चिंतेत.

  • 30 Dec 2020 12:58 PM (IST)

    प्रवाशांसाठी विस्टाडोम कोचमधून प्रवास करणं म्हणजे अविस्मरणीय अनुभव असेल : पियुष गोयल

    नवी मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पर्यटानाच्या संधी वाढत जाव्यात हा उद्देश समोर ठेवून विस्टाडोम कोचची निर्मीती केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कोचचा व्हिडीओ ट्विट करत या कोचमधून प्रवास करणं म्हणजे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल, असं म्हटलं आहे.

  • 30 Dec 2020 12:26 PM (IST)

    नागपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त

    नागपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाकडून आज अनिल देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गृहमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ताच बंद ठेवला आहे.

  • 30 Dec 2020 12:18 PM (IST)

    न्यू ईयर सेलिब्रेशनपूर्वी गृहमंत्र्यांचं नियमांकडे बोट, रात्री 11 नंतर हॉटेल, बार बंद

    गेट वे, मरीन ड्राईव्हला 5 पेक्षा जास्त लोकांना बंदी, रात्री 11 नंतर हॉटेल बंद, गृहमंत्र्यांचं नियमांकडे बोट

  • 30 Dec 2020 12:17 PM (IST)

    सीबीआयला अटकाव केला त्यामुळे भाजपकडून ईडीचा वापर : अनिल देशमुख

    मुंबई : “भाजप सुडाचं राजकारण करत आहे. भाजपविरोधात बोललं की लगेच ईडीची नोटीस पाठवली जात आहे. हेच काम सीबीय करायची. पण आम्ही सीबीआयला अटकाव केला. राज्याची परवानगी घेतल्यासिवाय सीबीआयला चौकशी करता येत नाही. त्यामुळे सीबीआयच्या बाबतीती केंद्र सरकार काही करु शकत नाही,” गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तसेच ईडीचा वापर राजकारणासाठी होत असून अशा पद्धतीने सूड घेण्यापर्यंतचं राजकारण भारताता पाहिलं नससल्याचं सांगत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

  • 30 Dec 2020 12:17 PM (IST)

    मनसेचे कंगना रनौतला छुपे संरक्षण

    कंगना रनौत हिने मंगळवारी प्रभादेवी येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यावेळी कंगना रनौत हिला मनसेकडून छुपे संरक्षण देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांचे बंधू कुशल धुरी काल कंगना रनौत सोबत उपस्थित होते. मनीष धुरी हे पक्षात राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.

  • 30 Dec 2020 11:58 AM (IST)

    ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठीचा गोंधळ सुरूच, मुदत वाढवून देण्याची मागणी

    पुणे : ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. ही अडचण लक्षात घेता पुणे जिल्ह्यात अनेकांचे अर्ज न भरले गेल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीदेखील उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची इच्छुकांकडून मागणी केली जात आहे.

  • 30 Dec 2020 11:51 AM (IST)

    राज्यात नव्या कोरोना विषाणूचा रुग्ण सापडलेला नाही, योग्य खबरदारी घेतली जात आहे : राजेश टोपे

    मुंबई : राज्यात नव्या कोरोना व्हायरसचा रुग्ण राज्यात‌ नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशात काही ठिकाणी नव्या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्या अनुशंगाने खबरदारी घेतली जात आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरन्टाईन केलं जात आहे, असे सांगत राज्यात सध्या नव्या विषाणूची लागण झालेला रुग्ण सापडला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  • 30 Dec 2020 11:12 AM (IST)

    राजापूर तालुक्यात चार वाहनांना आग, लाखोंचे नुकसान

    रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धोपेश्वर-खंडेवाडी येथे चार वाहने आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक रिक्षा आणि तीन दुचाकींचा समावेश आहे. अज्ञात व्यक्तीने सूडबुद्धीने गाड्यांना आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झालेअसून राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दाखल करण्यात आली आहे.

  • 30 Dec 2020 11:01 AM (IST)

    सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा

    सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना काळे यांनी केली फोनवरून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकमंगल समूहाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी टॉयलेट आणि कचरापेट्या तसेच इतर साहित्याची व्यवस्था करावी असे राजेश काळे यांचे मत होते. मात्र, प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठवता येणार नाही, त्यामुळे पत्रव्यवहार करणे अपेक्षित असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे मत होते. याच वादातून काळे यांनी शिवीगाळ खेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपा अंतर्गत काळे यांच्या विरोधात बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 30 Dec 2020 10:31 AM (IST)

    ब्रिटनहून चंद्रपुरात आलेल्या दोघांची तपासणी, कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

    चंद्रपूर : जिल्ह्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत एक पुरुष आणि एका महिलेचा शोध लागला असून त्यांची नव्या कोरोनासाठीची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभाग दोघांनाही गृह विलगिकरणात ठेवून देत त्यांच्याकडे विशेष लक्ष देणार आहे.

  • 30 Dec 2020 10:00 AM (IST)

    सप्तशृंगी देवीचे मंदिर 31 डिसेंबरपासून 24 तास खुले, भाविकांच्या गर्दीमुळे निर्णय

    नाशिक : सप्तशृंगी देवीचे मंदिर 31 डिसेंबरनंतर 24 तास खुले राहणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी मंदिरात दर्शन घेताना भाविकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिर्डीनंतर सप्तशृंगी मंदिर प्रशासनादेखील मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 30 Dec 2020 09:52 AM (IST)

    नायलॉनच्या मांजावर नव्याने बंदी, उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार

    नाशिक : नायलॉनच्या मांजावर आजपासून नव्याने बंदी घालण्यात आली आहे. 28 जानेवारीपर्यंत ही बंदी कायम असेल. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करताना कुणी आढल्यास पोलिसांकडून थेट कारवाई करण्यात येणार आहे. नायलॉनच्या मांज्यमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

  • 30 Dec 2020 09:11 AM (IST)

    सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या परवानगीबाबत आज निर्णय

    सोलापूर : श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या परवानगीबाबत आज होणार निर्णय होणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव याबाबत निर्णय घेतील. दरम्यान, निर्णयाबाबत संजय शिंदे विजयकुमार देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने विभागिय आयुक्तांची भेट घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा प्रतिकात्मक पद्धतीने संपन्न व्हावी अशी प्रशासनाची भूमिका आहे.

  • 30 Dec 2020 08:57 AM (IST)

    पुण्यातील शिवाजीनगरातील जम्बो कोव्हीड सेंटर 1 जानेवारीपासून बंद

    पुणे : शिवाजीनगरातील जम्बो कोव्हीड सेंटर 1 जानेवारीपासून बंद होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात सध्या 150 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवून सध्याचे जम्बो कोव्हीस सेंटर बंद केले जाणार आहे.

  • 30 Dec 2020 08:56 AM (IST)

    पुण्यात पीएमपीएमएलच्या बससेवेला प्रतिसाद वाढला, 4 महिन्यांत प्रवासी 5 लाखांवर

    पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार महिन्यांमध्ये 5 लाखांवर पोहोचली आहे. लॉकडाऊनमध्ये ही बससेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यानंतर आता या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 30 Dec 2020 08:36 AM (IST)

    ब्रिटनहून कोल्हापुरात आलेल्या 8 जणांचा पत्ता लागेना, प्रवाशांची ठोस माहिती नाही

    कोल्हापूर : ब्रिटनहून कोल्हापुरात आलेल्या 8 प्रवाशांची निश्चित माहिती मिळत नाहीये. आठ जणांपैकी 7 प्रवासी हातकणंगले येथील आहेत. तर करवीर तालुक्यातील एक प्रवासी हा ब्रिटनहून परतला आहे. मात्र, त्यांची निश्चित माहिती मिळत नासल्यामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली आहे.

  • 30 Dec 2020 08:22 AM (IST)

    नव्या वर्षात टोल प्लाझावर महत्त्वाचा बदल, वाहनांवर फास्टटॅग असल्याशिवाय प्रवेश नाही

    मुंबई : नव्या वर्षात टोल प्लाझाबाबत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नव्या वर्षात वाहनांवर फास्टटॅग असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, फास्टटॅग सर्व वाहनांवर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार फास्टटॅग नसलेल्या वाहनांना टोल नाक्यावर जाणापूर्वीच थांबवले जाणार आहे.

  • 30 Dec 2020 08:01 AM (IST)

    कोरोगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर 77 कार्यकर्त्यांना जिल्हाबंदी

    पुणे : कोरोगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर 77 कार्यकर्त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांना 30 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधात्मक व्यक्ती जिल्ह्यात दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

  • 30 Dec 2020 07:46 AM (IST)

    ब्रिटनहून औरंगाबादेत आलेल्या महिलेचा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण नाही

    औरंगाबाद : ब्रिटनहून औरंगाबादला आलेल्या महिलेला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेली नाही. तिला सामान्य कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. ब्रिटनहून परतल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सध्या तिची प्रकृती स्थिर अस्यामुळे तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • 30 Dec 2020 07:36 AM (IST)

    नागपुरात नववर्ष जल्लोवर बंदी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

    नागपूर : नागपुरात नववर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या जल्लोषावर प्रशासनाने बंदी घातली आहे. या नियमानुसार नागपुरातील तलाव परिसर, रस्ते, बगीचे अशा कोणत्याही ठीकाणी जल्लोष करता येणार नाही. तसेच, नागरिकांनी या वर्षाचं स्वागत घरात राहूनच करावे असे आवाहन पोलीस आणि महानगरपालिकेने केले आहे. नियमांचं अल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून त्याबाबत मनपा आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

  • 30 Dec 2020 07:07 AM (IST)

    मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या 5 अट्टल चोरांना बेड्या; नायगावमध्ये पोलिसांची कारवाई

    नांदेड : मौजमजेचा खर्च भागवण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांना नायगाव तालुक्यातील बरबडा गावात चोरी करताना पकडण्यात आले आहे. चोरीच्या घटनेतील सर्व आरोपी 20 वर्षीय आहेत. दरम्यान, पाचही जणांना पोलिसांनी केली अटक असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • 30 Dec 2020 07:00 AM (IST)

    दत्तात्रय भरणेच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन, 11 वाजता अंत्यसंस्कार

    पुणे : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वडील विठोबा भरणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. भरणे यांच्या वडिलांवर आजा सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 30 Dec 2020 06:21 AM (IST)

    ईडीचा वापर करुन राज्यातील सरकार पाडता येणार नाही, अंधश्रद्धेतून बाहेर पडा : शिवसेना

    मुंबई : भाजपला ईडीचा वापर करुन राज्यातील सरकार पाडता येणार नाही. त्यांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडायला हवे, असे खडे बोल शिवसेनेने भाजपला सामना अग्रलेखाच्या माध्यमातून लगावले आहेत. “ईडीच्या बाबतीत ज्यांना घटना आठवते त्यांनी राज्यपालनियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. ‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे. कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अंध:पतन जोरात सुरु असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला आहे.