पाऊस LIVE : येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

| Updated on: Jul 01, 2019 | 5:04 PM

मुंबईसह राज्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. आज (1 जुलै) मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पाऊस LIVE : येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज
Follow us on

मुंबई : मुंबईसह राज्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. मुंबईसह वसई-विरार, ठाणे-कल्याण, शहापूर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढलं आहे. तसेच आज (1 जुलै) मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LIVE UPDATE

[svt-event title=”नाशिकमध्ये पावसाला सुरुवात” date=”01/07/2019,5:03PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात ..अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू [/svt-event]

[svt-event title=”24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज” date=”01/07/2019,4:05PM” class=”svt-cd-green” ] पालघर- ठाण्यात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज , मुंबई हवामान विभागाची माहिती, तर मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”पूल पाण्याखाली, विरारजवळच्या 20-25 गावांचा संपर्क तुटला” date=”01/07/2019,3:52PM” class=”svt-cd-green” ] मेढा आणि पांढरतारा पूल पाण्याखाली, विरारच्या ग्रामीण भागातील 20 ते 25 गाव पाड्यांचा संपर्क तुटला, नावसाई, जामबुळ पाडा, तल्याचापाडा, हत्तीपाडा, आडणे, भिणार, आंबोडे, मेंढा, वडघर, काळबोन, लेंढ, यासह आजूबाजूच्या गाव- पाड्यांचा संपर्क तुटला [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारमध्ये सापांचा सुळसुळाट” date=”01/07/2019,3:47PM” class=”svt-cd-green” ] सततच्या पावसाने वसई, विरार, नालासोपारा शहरात विषारी साप बाहेर निघत आहेत. सुखरूप जागा शोधण्यात हे साप सोसायटी, शेतात फिरत आहेत. आज दिवसभरात वसई, विरार, नालासोपाऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 30 साप पकडून जंगलात सोडले आहेत. यात नाग, घोणस, कोबरा नाग यासह अन्य सापांचा समावेश होता. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाचा जोर वाढला” date=”01/07/2019,3:35PM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला. दुपारी काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने साडेतीनच्या सुमारास पुन्हा जोर धरला [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू” date=”01/07/2019,2:59PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – वीज पडून तीन जणांचा मृत्यू, दक्षिण सोलापूर मंद्रुप येथील घटना, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश, शेतात काम करत असताना वीज पडल्याने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”चेंबुर, धारावीत घरांमध्ये पाणी” date=”01/07/2019,1:21PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”किंग सर्कलमधील परिस्थिती” date=”01/07/2019,10:42AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज्यमंत्री रवींद्र चव्हाण लोकलमध्ये अडकले” date=”01/07/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चर्चगेट ते मुंबई सेंट्रल फास्ट लोकल” date=”01/07/2019,9:58AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत कुठे कुठे पाणी तुंबलं” date=”01/07/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत 17 ठिकाणी पाणी तुंबलं धारावी, विद्यालंकार कॉलेज वडाळा,आंबेडकर रोड भायखळा, दादर टीटी, हिंदू कॉलनी, रेल्वे कॅम्प, महालक्ष्मी, जीटीबी नगर, SCLR ब्रिज, घाटकोपर, चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी, तपस्या कॉलेज चेंबूर, शिंदेवाडी, म.फुले नगर, वांद्रे बस डेपो, खेरवाडी [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत जोरदार पाऊस” date=”01/07/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत सकाळपासून सुरु जोरदार पाऊस, सायन- पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरले, पुण्याकडे जाणारी वाहतूक धीमी,नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरलं [/svt-event]

[svt-event title=”लोकल ट्रेन अपडेट” date=”01/07/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] मुंबई #पाऊस लाईव्ह – ?मध्य रेल्वेवर CSMT कडे येणाऱ्या लोकल कुर्ल्यात रखडल्या ?पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली, मरीन लाईन्स-चर्चगेट वाहतूक ठप्प ?हार्बर रेल्वेवर मानखुर्द-चुनाभट्टीजवळ ट्रॅकवर पाणी, लोकल 30 मिनिटे उशिरा [/svt-event]

[svt-event title=”कुर्ल्यात प्रचंड गर्दी” date=”01/07/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ] मध्य रेल्वे कुर्ला स्टेशन परिसरात रखडल्या, प्लॅटफॉर्मवर गर्दी, प्रवाशांची ट्रॅकवरुन पायपीट [/svt-event]

[svt-event title=”सायनमध्ये कमरेपर्यंत पाणी” date=”01/07/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मरीन लाईन्स स्टेशन परिसरात ओव्हरहेड वायर तुटली, चर्चगेट ते मरीन लाईन्स रेल्वे वाहतूक बंद” date=”01/07/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अकोला जिल्ह्यातील बाळपूर तालुक्यात निंबा सर्कल परिसरात रात्रभरात 62 मिमी पावसाची नोंद” date=”01/07/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला कुर्ला या सारख्या सखल भागात पाणी साचलं” date=”01/07/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस” date=”01/07/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मध्य रेल्वे विस्कळीत, मुंबईत सायन ते मांटुगा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ पाण्याखाली, रस्त्यावरही पाणी तुंबले” date=”01/07/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पालघर : मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये पाणी तुंबले, दक्षिण गुजरात आणि पालघरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत” date=”01/07/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ] वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाइंग राणी, डहाणू पनवेल मेमो, विरार शटल, डहाणू अंधेरी मेमो यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द तर डहाणूकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द [/svt-event]

[svt-event title=”कर्जत खोपोली रेल्वे रुळावर मस्को कंपनीच्या गेटजवळ मोठे झाड कोसळले, खोपोली कर्जत रेल्वे सेवा बंद” date=”01/07/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत मुसळधार पावसामुळे मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड या सखल भागात पाणी साचले” date=”01/07/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई सांताक्रुज वेधशाळेनुसार गेल्या २४ तासात ९२.९ मिमी पावसाची नोंद, कुलाबा वेधशाळेनुसार गेल्या २४ तासात ७८.५ मिमी पावसाची नोंद ” date=”01/07/2019,8:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील तिन्ही लोकल सेवा विस्कळीत” date=”01/07/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत हिंदमाता, परळ, अंधेरी, कुर्ला यासारख्या सखल भागात पाणी तुंबले” date=”01/07/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा” date=”01/07/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ]