मुंबईच्या महापौरांचा दालनातच ठिय्या, प्रभाग समित्यांच्या निवडणुकासांठी कर्मचारी गैरहजर

| Updated on: Oct 14, 2020 | 11:46 AM

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar agitation in BMC Office)

मुंबईच्या महापौरांचा दालनातच ठिय्या, प्रभाग समित्यांच्या निवडणुकासांठी कर्मचारी गैरहजर
Follow us on

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी स्वत:च्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आयोजित केल्या होत्या. मात्र या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारीही गैरहजर राहिले. तर चिटणीस विभागातील केवळ दोनच कर्मचारी उपस्थित असून बाकी कर्मचारी मात्र गैरहजर होते. त्यामुळे महापौरांनी आक्रमक पावित्रा घेत स्वत:च्या दालनातच ठिय्या मांडला. (Mumbai Mayor Kishori Pednekar agitation in BMC Office)

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी 10 वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते.

पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. तर चिटणीस विभागातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर होते. तसेच जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तही गैहरजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या.

 

कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणुका घ्यायच्या कशा? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पालिकेचे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं. यासाठी महापौर किशोरी पेडणेकरांनी ठिय्या आंदोलन केलं.

मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्ये काॅग्रेसच्या अप्रत्यक्ष मदतीनं सेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवल्यानंतर आज प्रभाग समित्यांच्या निवडणुका आयोजित करण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी आकड्यांची गणित जुळवण्यासाठी सेनेला काँग्रेसची मदत घ्यावी लागेल.

पालिकेच्या 17 पैकी 8 प्रभाग समित्यांच्या निवडणुका आहेत. यंदा 17 पैकी 6 प्रभागांत बिनविरोध निवडणूक होईल. कारण, 6 प्रभागांमध्ये केवळ एकाच उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे. तर बिनविरोध निवडणुकीत सेनेचे 3 तर भाजपचे 3 अध्यक्ष निवडून येतील.  (Mumbai Mayor Kishori Pednekar agitation in BMC Office)

संबंधित बातम्या : 

मास्क न वापरल्यास दुप्पट दंड, मुंबई मनपा आणखी आक्रमक

सावधान ! विनामास्क आढळल्यास मुंबई महापालिका पोलिसांच्या मदतीनं कारवाई करणार