मुंबई : “यंदा नवीन वर्षाचं स्वागत घरी राहूनच करा,” असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुंबईकरांना केले आहे. “मुंबईकरांनो कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या. मार्चपासून सर्व सण घरीच साजरे करण्यात आले आहेत. नवीन वर्षात घरीच बसून जल्लोष करा. एकाच्या चुकीमुळे अनेकांना अडचणीत आणू नका,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar On New Year Celebration)
“यंदा घरी बसून 31 डिसेंबरला रात्री प्रार्थना करा. नवीन वर्षाचं स्वागत करा. मुंबईकर गाईडलाईन पाळत आलेले आहेत. ज्यांना यात राजकारण करायचं आहे. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करतील,” असा टोला किशोरी पेडणकरांनी लगावला.
“कोरोना रात्रीचा फिरतो का? अस म्हणणाऱ्यांना कळलं पाहिजे की नवीन वर्ष स्वागत करताना रात्री गर्दी होते. म्हणून हे निर्बंध आहेत. राजकारणी लोकांना जर मुंबईकरांच्या जीवावर उठायचं असेल तर याला कायदा आहे,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
“2020 वर्ष हे कधी विसरु शकणार नाही. कोरोनामुळे अनेक जण मृत्यू पावले आहे. नातेवाईक, अनेक जवळ लोक सोडून गेलेत. कोरोना काळ आणि हे वर्ष विसरणार नाही,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
“ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था, सत्य निश्चितपणे बाहेर येईल”
“ईडी ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्था आहे. जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे जनतेचे देखील मत आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत हातात मिळाले आहे. परंतु निश्चितपणे जे सत्य आहे ते बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
“कोरोना महामारीमुळे नववर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या 31 डिसेंबर आहे. जगातील अनेक पाश्चात्त्य देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्याचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे राज्यात राबवण्यात येणाऱ्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेला यापुढे सहकार्य करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहकार्य करायचे आहे,” असेही त्यांनी सांगितले. (Mumbai Mayor Kishori Pednekar On New Year Celebration)
“राज्यात 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर याचे पालन केले नाही, तर निश्चितपणे पोलीस योग्य ती कारवाई करतील,” असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
“येणारे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे जावो,” अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“शिवसेना नेते संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत. ते शिवसेनेचे सचिव आहे. त्यामुळे महिन्यातून एक-दोन वेळा त्यांची भेट होत असते. घरात मंगल कार्य आहे. त्याचे आमंत्रण देण्यासाठी राऊतांची भेट घेतली,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी राऊतांच्या भेटीनंतर दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar On New Year Celebration)
संबंधित बातम्या :
सिद्धिविनायक दर्शनावेळी राज ठाकरेंचा ‘मसल मॅन’ सोबतीला, कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा?
weather forecast | मुंबईत पारा 17 अंशावर, माथेरानमध्ये मुंबईपेक्षा अधिक थंडी