मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिचारिकांशी संवाद साधला. किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या वेषात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला. महापौरांनी फेसबुक पेजवर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in Nair Hospital)
मुंबईतील 53 पत्रकारांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. यापैकी काही पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे किशोरी पडणेकर यांनी स्वत:हून 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. या काळात त्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि व्हॉट्सअॅपद्वारे घरुनच महापालिकेची सर्व कामे करत होत्या. आता, आठवड्याभराच्या आतच त्या नायर हॉस्पिटलमध्ये नर्सशी संवाद साधण्यास गेल्या.
कौतुकास्पद ! कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी मुंबई मनपाच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर कोवीड योद्धा झाल्या आहेत. परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केले असल्याने आपल्या अनुभवाचा उपयोग करत त्या मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. किशोरी ताईंचे आभार! @KishoriPednekar pic.twitter.com/5ETjmi9Jjs
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 27, 2020
विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेच्या ‘प्रथम ती’ या महिला सबलीकरणाच्या उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला होता.
किशोरी पेडणेकर यांचा परिचय :
(Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in Nair Hospital)