मुंबई : फक्त धार्मिक स्थळंच नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमुळेही कोरोनाचा प्रसार होतो, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितलं. लांब पल्ल्याच्या गाड्या 15 दिवसांसाठी रद्द कराव्या, याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, असं पेडणेकर यांनी सुचवलं. मुंबईकरांना सावध राहण्याचा इशाराही महापौरांनी दिला. (Mumbai Mayor Kishori Pednekar suggests to cancel long distance railway for 15 days)
“कोव्हिडचा आकडा फुगत आहे. मात्र कोरोनाबाबत जनता गंभीर नाही. कोव्हिडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावं. लांब पल्ल्याच्या गाड्या 15 दिवसांसाठी रद्द कराव्या, याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. केवळ धार्मिक स्थळांमुळे कोरोना पसरतो, असं मी म्हटलं नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या व्यक्तींमुळेही कोरोना पसरला.” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दिल्लीत 19 नोव्हेंबरला 24 तासांच्या कालावधीत तब्बल 7 हजार 546 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे दिवसभरात 98 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे.
येत्या 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
भाजपचा समाचार
मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्क्याच्या लोकांनी घातला आहे, आम्ही त्यांना दाखवून देऊ आमची ताकद काय आहे, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपला टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आहेत, म्हणून इतर राज्यातील तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस कमी आहेत. (Mumbai Mayor Kishori Pednekar suggests to cancel long distance railway for 15 days)
लव्ह जिहाद नक्की कुठे झाला, हे आम्ही दाखवून देऊ. भाजप पक्षाचा हा अजेंडा आहे. मुला-मुलींच्या पसंतीचा विषय आहे, भाजप फक्त शब्दांचा खेळ करतंय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
नाशिकमधील शाळा सुरु की निर्णय पुढे ढकलावा, उद्या तातडीची बैठक : छगन भुजबळ https://t.co/maR0tlemmV @ChhaganCBhujbal #Nashik #SchoolReopen
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2020
संबंधित बातम्या :
‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर
दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन
Mumbai Mayor Kishori Pednekar suggests to cancel long distance railway for 15 days