मुंबई: मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. महापौर महाडेश्वर यांना काल रात्रीपासून उलट्या होत असल्याने, त्यांना लीलावती रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं.
सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. गेल्या चार दिवसात राज्यभरात बोचरी थंडी होती. मुंबईतही थंडीचा जोर पाहायला मिळाला. वातावरणात बदल झाल्यामुळे महापौर आजारी पडले असण्याची शक्यता आहे. मात्र महापौरांना रात्री अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना आज लीलावती रुग्णालयात अॅडमिट करावं लागलं.
सध्या महापौर महाडेश्वर यांच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर त्यांना अपक्षांचीही साथ मिळाली होती. त्यामुळे महापौर निवडणुकीत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. तेव्हापासून विश्वनाथ महाडेश्वर मुंबईचे महापौरपद सांभाळत आहेत.