मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो 3’ मार्गावर ‘सीएसएमटी’ ते मुंबई सेंट्रलपर्यंत भुयारीकरणाचा 28 वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. एकाच टप्प्यात सलग चार किलोमीटर अंतराचे भुयारीकरण करणारे वैतरणा 2 हे ‘मेट्रो 3’चे पहिले टीबीएम (Tunnel boring machine किंवा बोगदा खोदणारे यंत्र) ठरले. (Mumbai Metro 3 Underground Work)
‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’द्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा भुयारीकरणाचा महत्त्वाचा 28 वा टप्पा काल पार पडला. 26 महिन्यांमध्ये सलग चार किमी अंतराचे भुयारीकरण करण्यात आले. प्रतिदिन 6.3 मीटर वेगाने हे काम सुरु होते.
पॅकेज 2 च्या वैतरणा 2 या टीबीएमद्वारे भुयारीकरणाला फेब्रुवारी 2018 मध्ये सीएसएमटी लॉचिंग शाफ्ट येथून सुरुवात झाली होती. एकूण 2730 काँक्रीट रिंग्जचा वापर करत मेट्रो 3 मार्गिकेवरील मुंबई सेंट्रलपर्यंतचा सर्वात जास्त अंतराचा पल्ला वैतरणा 2 टीबीएम ने गाठला.
पॅकेज 2 अंतर्गत येणारा भाग हा समुद्र किनाऱ्याला समांतर होता. तसेच या मार्गावर अनेक जीर्ण आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी एक ते चार मीटर इतक्या जवळ अंतरावर होती. त्यामुळे मार्गिकेतील भुयारीकरणाचा हा टप्पा सर्वात आव्हानात्मक होता.
कोविड19 च्या साथीमुळे हे काम अधिकच आव्हानात्मक झाले होते. मात्र राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे कठोर पालन करुन शारीरिक अंतर ठेवत हे काम पूर्ण केले, अशी प्रतिक्रिया ‘मेट्रो 3’ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी दिली.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रल दरम्यान चार किमी भुयारीकरणाअंतर्गत सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल या पाच भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.
MMRC achieves its 28th Breakthrough as PKG 2 attains 100% tunneling. TBM Vaitarna 2 completed the longest drive of 3.8 Kms within the alignment frm #CSMT to #MumbaiCentral in 26 mnths at an avg of 6.3 mtrs/day. PKG 2 comprises of #CSMT #Kalbadevi #Girgaum & #GrantRd stns pic.twitter.com/2Up9bCuSbT
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) April 30, 2020
(Mumbai Metro 3 Underground Work)