मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मेट्रो अखेर आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या दरम्यानच मेट्रो धावणार आहे. सध्या लोकल सेवा सुरु असली तरी त्यात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाचं प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पण मेट्रो सेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांना काहीअंशी तरी दिलासा मिळाला आहे. (After 7 months Mumbai Metro starts from today)
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या मेट्रोच्या 50 टक्केच फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. गरज भासली तर त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार दररोज मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार आहेत. एका स्थानकावर मेट्रो थांबण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता मेट्रो 30 ते 60 सेकंदांपर्यंत स्थानकात थांबेल.
– मेट्रोचा प्रवास करताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे.
– मेट्रो प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाला आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्यसेतू’ अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य आहे.
– स्थानकात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर गरजेचा आहे.
– संसर्ग टाळण्यासाठी दर दोन तासांनी स्थानकांवरील प्रवाशांशी संपर्क येणारी सर्व ठिकाणं निर्जंतुक केली जाणार आहेत.
– तसेच प्रत्येक फेरीनंतर मेट्रोच्या डब्यांचेही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
– मेट्रोमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रिनिंग केले जाईल.
– मानवी संपर्क टाळण्यासाठी आता प्लास्टिक टोकन ऐवजी कागदी तिकीट आणि मोबाईल तिकीटाचा पर्याय देण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!
नवी मुंबई मेट्रोला चीनचे डबे, प्रकल्प पूर्ण करण्याबाबत ‘सिडको’ला चिंता
After 7 months Mumbai Metro starts from today