सिद्धिविनायक दर्शन ते थेट… राजीनाम्यानंतर मिलिंद देवरा दिवसभर काय काय करणार? संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

| Updated on: Jan 14, 2024 | 1:21 PM

Milind Deora Day Plan After Resigned from Congress : काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मिलिंद देवरा आज दिवसभर काय काय करणार? काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा काय करणार? त्यांचा दिनक्रम काय? कोणत्या पक्षात प्रवेश करणार? वाचा संपूर्ण कार्यक्रम...

सिद्धिविनायक दर्शन ते थेट... राजीनाम्यानंतर मिलिंद देवरा दिवसभर काय काय करणार? संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : लोकसभा तोंडावर आहे. काँग्रेस भारत न्याय यात्रा काढणार आहेत. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असणाऱ्या मिलिंद देवरा यांनी आज अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांचं पुढचं राऊल काय असेल, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मिलिंद देवरा आज दिवसभर ते काय करणार आहेत? त्यांचा दिनक्रम कसा असेल? जाणून घेऊयात…

मिलिंद देवरा यांचा दिनक्रम

आज साडे 10 वाजता मिलिंद देवरा पेडर रोडवरील रामालायम या निवासस्थानावरून निघतील. सिद्धीविनायक मंदिरात जातील 11 वाजता ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर उपस्थित असतील. दुपारी 12 वाजता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.

थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश

दक्षिण मुंबईतील कुलाबा इथं रिगल सिनेमा जवळ ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजता ते रामालयाम या त्यांच्या निवास्थानी जातील. त्यानंतर दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जातील. आज दुपारी 2 वाजता त्यांचा शिवसेनेत प्रवेश करतील. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक असणार आहेत.

मिलिंद देवरा आज दुपारी 2 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही शिवसेनेत सामील होतील. 10 माजी नगरसेवक, 20 पदाधिकारी आणि 15 महत्त्वपूर्ण व्यापारी संघटना देवरा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करतील. याचसोबत 450 कार्यकर्ते आज शिवसेना पक्षात सामील होणार आहेत.

मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मिलिंद देवरा यांनी आज सकाळी एक ट्विट केलं. काँग्रेस पक्ष आणि देवरा कुटुंबाचं मागच्या 55 वर्षांपासून घनिष्ट नातं होतं. पण आता या नात्याला पूर्णविराम देत आहे. राजकीय प्रवासातील एक अध्याय इथे संपतो आहे. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार, असं ट्विट करत देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. थोड्याच वेळात ते शिवसेनेत प्रवेश करतील.