दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मिलिंद देवरा यांचे स्वागत करताना मनसैनिकानी मिलिंद देवरा यांना घातला मनसेचा शेला पाहायला मिळाला. मिलिंद देवरा यांनीही शाल निरखून पाहत स्मित हास्य केलंय. मिलिंद देवरा यांनी शाल स्वीकारल्यानंतर मनसैनिकांनी एकच जल्लोष केला.
तुम्ही मला मनसेचा शेला घेतला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी नुकताच शिवसैनिक झालो आहे आणि तुम्ही मला मनसैनिक पण केलं, असं मिलिंद देवरा म्हणाले. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मिलिंद देवरा बोलत होते.
मी स्वतःला मराठी माणूस समजतो. कारण माझ्या आईकडचे आडनाव फणसाळकर आहे. बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांना महाराष्ट्राचा जावई म्हणायचे. राज ठाकरे शब्दाची किंमत समजावतात. मराठी माणसाचा मोठा प्रश्न घर आहे. इकडे दक्षिण मुंबईमध्ये मोठी समस्या आहे. पडक्या बिल्डिंगमध्ये जीव धोक्यात घालून नागरिक त्यात राहत होते. मात्र माझ्या कार्यकाळात गिरणीतून पडक्या जागेत लोकांची राहण्याची सोय केली. तो प्रकल्प आता पूर्ण झाला आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले.
बाळा नांदगावकर यांचे काम मी पाहिलंय. त्यांचे अतिशय चांगले काम होते. मला हे सांगताना दुःख होत की अरविंद सावंत यांच्या स्वतःच्या बिल्डिंग ला OC नाहीये. अरविंद सावंत बिल्डिंगमधील लोकांना न्याय देऊ शकत नाहीत तर चाळीतील, भाड्याने राहणाऱ्या लोकांच्या समस्या काय सोडविणार?, असं म्हणत मिलिंद देवरा यांनी अरविंद सावंत यांच्यावर टीका केली आहे.