ठाणे : मुंब्रा बायपास हा आज रविवार 7 मार्च आणि रविवार 21 मार्च रोजी या दोन दिवशी (Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. मुंब्रा बायपास मार्गावर लोखंडी रेल्वेपूल उभारणीचे काम दोन दिवस करण्यात येणार आहे (Mumbai Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March).
या दिवशी मुंब्रा बायपास हा रस्ता वाहतुकीसाठी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
– वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीटीकडून मुंब्रा बायपासमार्गे नाशिक, भिवंडी आणि ठाणे ग्रामीणकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल, न्हावडे फाटा, तळोजे, एमआयडीसी, उसाटणे, खोणी, नेवाळी मार्गे, कल्याणमधून दुर्गाडीमार्गे भिवंडीकडे सोडण्यात येणार आहे.
– तर नाशिकडे जाणाऱ्या वाहनांना आधारावाडी जेल, बांपगांव, पडघा नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गाने नाशिकला जाता येईल.
– तर ठाण्यातून जाण्यासाठी कल्याणफाटा, शिळफाटा येथून महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने माजीवड्यामार्गे जाता येईल (Mumbai Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March).
– गुजरात, पालघर येथून घोडबंदरमार्गे येणाऱ्या वाहनांना घोडबंदर रोडवरून ऐरोलीमार्गे नवी मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. तर नाशिकडून येणाऱ्या वाहनांनाही कल्याणमार्गे नवी मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.
पत्रीपुलाला अब्दुल कलाम यांचं नाव द्या; आजपासून वाहतुकीसाठी पूल सुरुhttps://t.co/yJZRPryUTW@CMOMaharashtra @AUThackeray @mieknathshinde #patripool
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
Mumbai Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March
संबंधित बातम्या :
इचलकरंजीत रस्ता सुरक्षा अभियान, बेवारस वाहने, हातगाड्या आणि जाहिरातींचे फलक जप्त