मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशास्थितीतही मुंबईतील कोरोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी केलाय. मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र, काळजी घेण्याचं आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळण्याचं आवाहनही महापालिका आयुक्तांनी केलंय.(Iqbal Chahal claims that arrangements are possible even if 10,000 corona cases are found)
“10 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान मृत्यू दर हा 0.3 टक्के आहे, 10 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान 56 हजार 220, काल 40 हजार 400 कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी 5 हजार 458 कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. यातील 83 टक्के कोरोना रूग्ण लक्षण नसलेले आहेत, बुधवारी 10 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 10 हजार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आल्यास देखील उपचाराची व्यवस्था मुंबईत आहे, असा दावा चहल यांनी केलाय. तसंच मुंबईत 10 लाख जणांचं कोरोना लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. पण मुंबईत दिवसाला 1 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा आमचा मानस असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
मुंबईतील बुधवारचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत काल दिवसभरात 5 हजार 185 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 88 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मुंबईत काल दिवसभरातील मृतांची संख्या 6 आहे. त्यातील काहीजणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर 84 दिवसांवर आला आहे.
#CoronavirusUpdates
24-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/nLAHic0xJ8— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 24, 2021
राज्य सरकार आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याचं कळतंय. त्यासंदर्भात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक पार पडली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने स्वतंत्र संस्था स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने स्वतंत्र संस्था स्थापन करणेबाबत बैठक पार पडली. pic.twitter.com/DTcBm5A33m
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 24, 2021
यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील,अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग,अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग,सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग,कुलगुरू/कुलसचिव मुंबई विद्यापीठ, आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, संचालक आरोग्य सेवा (२) पुणे,संचालक आय. आय. टी.पुणे, कुलगुरू आय. सी. टी.मुंबई,संचालक नॅनो सेंटर मुंबई विद्यापीठ,प्राध्यापक तथा शास्त्रज्ञ आय.सी.टी. मुंबई, संचालक रेडीयल लॅबोरेटरी पुणे व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
India Corona Update : एप्रिल-मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरात, 100 दिवस सावधगिरी बाळगण्याची गरज!
Iqbal Chahal claims that arrangements are possible even if 10,000 corona cases are found