मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतील (Mumbai BMC Election 2022) चित्र वेगळं असणार आहे. एकतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी (Shivsena Rebel MLA) नवा शिंदे गट स्थापन करुन भाजपसोबत हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर नक्कीच होणार आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला असला तरी, आता भगवा फडकवणार की शिंदे-फडणवीस मिळून कमळ (BJP) फुलवणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 124 मध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवारांनी आपले नशीब अजमावून बघितले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती हारुण खान विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर जोरदार टक्कर देत त्यांनी आपल्या नावाची मोहोर मुंबई महानगरपालिकेवर उमटवली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत काय होणार ते सध्याच्या राजकारणावर अवलंबून असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती हारून खान, शिवसेनेच्या शामली शैलेश तळेकर, भाजपच्या नमिता जीवन किणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रशिदा खलील खोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पना पियूष छेडा यांनीही या निवडणुकीत आपले नशीब अजमावून पाहिले मात्र राष्ट्रवादीच्या ज्योती खान यांनी मुंबई मनपाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
कल्पना पियूष छेडा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-848
संजना संजय जाधव (बहुजन समाज पार्टी)-161
ज्योती हारून खान (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)-6686
नमिता जीवन किणी(भारतीय जनता पार्टी)-3906
रशिदा खलील खोत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-846
शेख फरिदा हयात (समाजवादी पार्टी)-62
शेख शमीरा मुख्तार (ऑल इंडिया मजलिस इत्तेहद्दूल मुस्लिमीन)-1017
तळेकर शामली शैलेश (शिवसेना)-3569
कांबळे उज्वला रमेश (रिपब्लिकन सेना)-29
जाधव संजना राजेंद्र (अपक्ष)-57
अॅड. सरिता राऊळ कामत (अपक्ष)-61
तांबे ललिता रोहित (अपक्ष)-2715
वरीलपैकी एकही नाही (NOTA)233
रोया पाम रोड व पी/दक्षिम विभागाच्या सामाईक सीमेच्या नाक्यापासून पी/दक्षिण आणि एस विभागाच्या सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडील डोंगरावरील पाऊलवाटेने एस आणि टी विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत,तेथून टी आणि एस विभागाच्य सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे एस व एल विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (युनियन बँक व शिपींग कॉर्पोरेशनची पश्चिम कुंपनभिंत) तेथून उक्त सामाईक सीमेच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे व पश्चिम बाजूने दक्षिणेकडे आणि उत्तरबाजूने पश्चिमेकडे एस व पी दक्षिण विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (रॉयल पाम रोड) तेथून उक्त सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे पी दक्षिण व टी विभागाच्या सामाईक सामाईक रेषेपर्यंत आहे.
पक्ष | उमेदवार(Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | तळेकर शामली शैलेश | |
भाजप | नमिता जीवन किणी | |
राष्ट्रवादी काँग्रेस | ज्योती हारुण खान | ज्योती हारुण खान |
काँग्रेस | रशिदा खलील खोत | |
मनसे | कल्पना पियूष छेडा | |
अपक्ष / इतर | जाधव संजना राजेंद्र |