BMC Election 2022 (ward 181): शिंदे-फडणवीस सरकारचा परिणाम होणार की..; मुंबईकर शिवसेनेलाच मत देणार…

| Updated on: Jul 25, 2022 | 1:25 PM

आगामी निवडणुकीसाठी या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार इच्छूक असला तरी आता जर महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरवले तर मात्र नेमकं कोणावर गंडातर येणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी या प्रभागातून कोण निवडणूक लढविणार हे अजून तरी स्पष्ट होणारं चित्र नाही.

BMC Election 2022 (ward 181): शिंदे-फडणवीस सरकारचा परिणाम होणार की..; मुंबईकर शिवसेनेलाच मत देणार...
Follow us on

मुंबईः मुंबई महानगपालिकेच्या वॉर्ड क्र. 181 (Mumbai Municipal Corporation Ward No. 181) मध्ये काँग्रेसच्या पुष्पा कृष्णा कोळी (Pushpa Krishna Koli) यांनी विजय मिळविला आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी मात्र या प्रभागासाठी काँग्रेस का भूमिका घेणार ते याकडे शिवसेनेसह राष्ट्रवादीचे लक्ष लागून राहिले आहे. कारण आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत (Election) या प्रभागात काय चित्र असणार हे अजून स्पष्ट झाले नाही. कारण आगामी निवडणुकीसाठी या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार इच्छूक असला तरी आता जर महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरवले तर मात्र नेमकं कोणावर गंडातर येणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी या प्रभागातून कोण निवडणूक लढविणार हे अजून तरी स्पष्ट होणारं चित्र नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाक क्र. 181 मध्ये 12 उमेदवारा निवडणुकीच्या रिंगणात उभा होते, त्यापैकी पाच अपक्ष उमेदवार होते तर शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारही रिंगणात उतरले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 5723 मतं घेऊन विजयी झाल्या होत्या तर त्यांना शिवसेनेच्या माधुरी मनोहर ढोके यांनी टक्कर देत 3536 मतं घेतली होती. तर भाजपकडून या प्रभागात उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे 2017 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्येच लढत झालेली यावेळी काय निर्णय होणार हे आता पाहावे लागणार आहे.

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार

चंद्रकला अजिनाथ दहिफळे (अपक्ष)-527
माधुरी मनोहर ढोके (शिवसेना)-2536
स्नेहा गणेश हिवाळकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-566
इंगळे मीना फ्रान्सीस (अपक्ष)-2418
रुपाली मदन खळे (बहुजन समाज पार्टी) 240
पुष्पा कृष्णा कोळी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-5723
अरुणा श्रीकृष्ण मोहोड (अपक्ष)-361
अंकिता अशोक पाटील (अपक्ष)-155
अस्मिता गजानन पाटील (आरपीआय (ए)-2338
रोहिणी पाटील (सांगळे)- अखिल भारतीय सेना- 86
अकीला अन्वर पेजे (अपक्ष)- 859
नंदा एकनाथ वाघमारे (भारिप बहुजन महासंघ)- 619
नोटा- 407

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

श्रीसुंदरलिंगम देवेंद्र चौक येथे मुकुंदराव आंबेडकर मार्ग व ट्रक टर्मिनल मार्गाच्या नाक्यापासून वडाळा ट्रक टर्मिनल रोडच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे ट्रक टर्मिनल-वडाळा आरटीओच्या पश्चिम कुंपनभिंतीपर्यंत तेथून व उत्तर बाजूने पश्चिम पश्चिमेकडे विजयनगर बेहरानी मार्गापर्यंत तेथून विजयनगर बेहरानी मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे समाधान रोड पर्यंत तेथून समाधान रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे शेख मिस्त्री रोड पर्यंत तेथून शेख मिस्त्री रोडच्या पूर्व बाजून उत्तरेकडे मुकुंदराव आंबेडकर मार्गापर्यंत तेथून मुकुंदराव आंबेडकर मार्गाच्या पूर्वबाजूने उत्तरकडे ट्रक टर्मिनल मार्गापर्यंत. या प्रभागात कोकरी आगार, सीजीएस वसाहत सेक्टर 7 मोतीलाल नेहरुनगर ही प्रमुख ठिकाणं या प्रभागात येतात.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
काँग्रेसपुष्पा कृष्णा कोळी पुष्पा कृष्णा कोळी
शिवसेनामाधुरी मनोहर ढोके
भाजप
मनसेस्नेहा गणेश हिवाळकर
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्षचंद्रकला अजिनाथ दहिफळे