मुंबई | 25 जुलै 2023 : मुंबईचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या दहिसरला भाईंदरशी जोडणारा एलिवेटेड रस्ता तयार करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने टेंडर काढले आहे. दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम असा 45 मीटर रुंदीचा हा एलिवेटेड उन्नत स्वरुपाचा मार्ग येत्या चार वर्षांत बांधण्याची मुंबई महानगर पालिकेची योजना आहे. या मार्गामुळे मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा शेवटचा टप्पा असलेल्या दहीसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम या दोन टोकांना एलिवेटेड मार्गिकेने जोडण्याची मुंबई महानगर पालिकेची योजना आहे. या मार्गिकेसाठी मुंबई महानगर पालिकेने मागविलेल्या वित्तीय निविदांमध्ये सर्वात कमी बोली लार्सन एण्ड टुब्रोने लावली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महानगर पालिकेचे ट्वीटर पाहा : –
Exciting Update!
? The ambitious 45 mt wide Elevated Road project connecting Dahisar (West) to Bhayander (West) has reached a significant milestone with the opening of financial bids today. L & T is the lowest bid winner.
BMC is now looking forward to improved connectivity… pic.twitter.com/x8L4x6w0Ic
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2023
मुंबई महानगर पालिकेने या योजनेची माहीती आपल्या ट्वीटर हॅण्डलवर दिली आहे. मुंबई कोस्टल रोड योजनेचा हा अंतिम टप्पा असून यामुळे मुंबईकरांना चांगली कनेक्टीविटी उपलब्ध होणार आहे. ही उन्नत स्वरुपाची मार्गिका चार वर्षांत बांधून तयार होणार आहे. सध्या वेर्स्टन एक्सप्रेस हायवे वगळता मीरा भाईंदरला बृन्मुंबई क्षेत्राशी जोडणाऱ्या दहीसर चेक नाक्यावरुन पाच किमीच्या प्रवासाला सुमारे अर्धा तास लागतो. मुंबई ते अहमदाबाद हायवे पश्चिम उपनगर आणि मीरा-भाईंदरसाठी जोडणारा एकमेव मार्ग आहे.
मुंबई ते अहमदाबाह हायवे राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. नवा एलिवेटेड मार्ग तयार झाल्यास मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील ट्रॅफिकचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. दहिसर पश्चिमेचा भाग या मार्गाने भाईंदर येथील पश्चिम बाजूस जोडला गेल्यास मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरील गर्दी कमी होईल मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे.