नायर रुग्णालयातील निलंबित डॉक्टरविरोधात 10 विद्यार्थिनींची तक्रार

| Updated on: Sep 28, 2024 | 10:33 AM

Nair Hospital Molestation Case : मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये विनयभंगाचं प्रकरण उघडकीस आलं आहे. निलंबित डॉक्टराविरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली आहे. असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेने इशारा दिला आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

नायर रुग्णालयातील निलंबित डॉक्टरविरोधात 10 विद्यार्थिनींची तक्रार
डॉक्टर
Image Credit source: tv9
Follow us on

नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी चौकशी समितीसमोर तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या केंद्राकडून गुरुवारी पीडित तरुणीसह अन्य विद्यार्थिनींना चौकशीसाठी बोलविण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राअंतर्गत तक्रार समिती आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीमार्फत ही चौकशी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थिनींपैकी 10 विद्यार्थिनीनी सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

नायर रुग्णालयात विनयभंग प्रकरण उघडकीस आलं आहे. निलंबित डॉक्टरच्या विरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली आहे. प्राध्यापकाच्या विरोधात विनभंगाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून सुरु झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राने नायर रुग्णालयातील 10 विद्यार्थिनींची चौकशी केली. या विद्यार्थ्यांनी संबंधित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली.

सहाय्यक प्राध्यापक निलंबित

सहाय्यक प्राध्यापक डॉ. भेटे यांची बदली दुसरीकडे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र मुंबई महापालिकेने या सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित केलं. सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राने 25 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थिनींना त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात देण्यास सांगितल्या. त्यानंतर ज्या विद्यार्थिनींनी सहाय्यक प्राध्यापका विरोधात तक्रार केली होती. त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं. यावेळी तीन कर्मचारीदेखील इथे उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राच्या समितीसमोर या विद्यार्थिनींनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. या प्रकरणी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न या विद्यार्थी संघटनेने इशारा दिला आहे. सहायक प्राध्यापक, आणि अधिष्ठाता यांच्याविरोधात आम्ही तक्रार केली आहे. त्याबाबतचे पुरावे दिले आहेत. आम्ही सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे समितीने योग्य ती कारवाई करावी. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न या संघटनेने दिला आहे.