पुतण्याच्या मतदारसंघात काका; राज ठाकरे यांचे बीडीडी चाळीतील रहिवाशांना आदेश काय?

| Updated on: Nov 04, 2023 | 12:57 PM

MNS Leader Raj Thackeray in Worli BDD Chawl : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज बीडीडी चाळीत पोहोचले आहेत. त्यांनी तिथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या नागरिकांनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली... त्यांनी आपल्या समस्या राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.

पुतण्याच्या मतदारसंघात काका; राज ठाकरे यांचे बीडीडी चाळीतील रहिवाशांना आदेश काय?
Follow us on

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 04 नोव्हेंबर 2023 : मनसे नेते राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी भागातील बीडीडी चाळीला भेट दिली. वरळी हा ठाकरे गटाचे नेते, आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ… आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात त्यांचे काका राज ठाकरे यांनी पाहणी केली. वरळी बीडीडी चाळीचं काम सध्या सुरु आहे. राज ठाकरे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा तिथल्या स्थानिक नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. जोपर्यंत दिलेली आश्वासन पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत तुम्ही तुमची राहती घर खाली करू नका, असं नागरिकांना राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. अशी माहिती स्वतः स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

बहुमजली बीडीडीचा प्रकल्प सुरू असला तरी या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे. अशी बाब यावेळी समोर आली. स्थानिकांनी राज ठाकरे यांच्यासमोर हा मुद्दा मांडला. तुमचे प्रश्न सुटत नाहीत. दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत. तोवर घर सोडू नका, असं या वेळी राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला आश्वासन देत आहेत. परंतु म्हाडाचे अधिकारी याच्या विरूद्ध बोलत आहेत. हे राजकीय घोषणाबाजी आहेत, असं हे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ लक्ष घालावं, असे देखील स्थानिक नागरिक म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचा दरबार… वरळी बीडीडी चाळीचं काम सुरु आहे. राज ठाकरे यांनी कामाची पाहणी केली. स्थानिकांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचं काम सध्या सुरु आहे. या प्रकल्पाची राज ठाकरे यांनी माहिती घेतली. जवळपास 20 मिनिटं त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी राज ठाकरे यांनी केली. यावेळी राज ठाकरे यांनी स्थानिकांसह या कामाचं नियोजन पाहणाऱ्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांनी भेट दिली. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.