मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर टीका केली आहे. यंदा कर्नाटकच्या जनतेनं भाजपला साफ नाकारलं आहे. कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या पारड्यात बहुनत टाकलं आहे. बाजपने किती मुद्दे लावून धरले तरी त्याचा उपयोग झाला नाही. ना हिजाबचा मुद्दा चालला ना जय बजरंगबलीचा!, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सरकार जाणून-बुजून महाराष्ट्र मध्ये हिंदू मुसलमान वाद निर्माण करत आहे. मी या घटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन आहे. अल्लाहला शिवी देऊनजी घटना झाली त्या संदर्भात मुस्लिम लोक पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेले. मात्र कुणीही त्यांची तक्रार घ्यायला तयार नव्हतं.
अशी माहिती आहे की, पोलीस जेव्हा घटनास्थळी आले त्यावेळी हिंदू मुलाला हिंदू लोकांनीच मारलं. ज्या वेळी जाळ पोळ झाली. त्यावेळी आटोवर गरीब नवाज लिहिलं होतं. म्हणून त्या ड्रायव्हरला हिंदू लोकांनी मारहाण केली . तो मुस्लिम असेल म्हणून त्याला मारहाणी झाली .पण तो ड्रायव्हर हिंदू निघाला आणि त्याच मृत्यू झाला. मात्र पोलीस या घटनेमध्ये बघ्याची भूमिका घेत होते. कोणाच्या दबावामुळे पोलीस ही भूमिका घेत होते हा प्रश्न आहे, असं नाना पटोले म्हणालेत.
भाजप आणि सरकार या प्रकारच्या धार्मिक तेढाच्या घटना घडवण्यासाठी पुढे येतं आहे. त्यांनी हे पाप करणं थांबवलं पाहिजे. महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात अशा घटना होता कामा नयेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने हे थांबवलं पाहिजे. या घटना राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित आहेत. पोलीस एक तास उशिरा का पोहोचली याचे उत्तर देखील राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. असा घटना जाणीवपूर्वक केला जात आहेतअसं पटोले म्हणालेत.
सोळा आमदार आणि त्यांच्या अपात्रतेवर मला चर्चा करायची नाही. सरकार राहील की नाही त्यावर मला चर्चा करायची नाही. मात्र माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सरकार ही असंवैधानिक आहे. हे माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णयाने स्पष्ट झालं आहे, असंही पटोले म्हणालेत.