आर्यन खानला प्रकरणात 18 कोटींची डील झाल्याचा NCB व्हिजिलन्सचा खुलासा; समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ

| Updated on: May 15, 2023 | 4:02 PM

Shahrukh Khan Son Aryan Khan Case : समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; आर्यन खानला प्रकरणात 18 कोटींची डील झाल्याचं उघड; NCB व्हिजेलन्सचा मोठा खुलासा

आर्यन खानला प्रकरणात 18 कोटींची डील झाल्याचा NCB व्हिजिलन्सचा खुलासा; समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. आर्यन खानला प्रकरणात मोठा खुलासा 18 कोटींची डील झाल्याचा खुलासा NCB व्हिजिलेन्सने केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनमधले माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरत आहे. NCB व्हिजिलेन्सने 25 ऑक्टोबर 2021 ला या प्रकरणाचा तपास सुरू केला. आणि आता 11 मेला CBI कडे आपला अहवाल सादर केला. सीबीआयला सादर केलेल्या अहवालानुसार मोठी डील झाल्याचं समोर आलं आहे.

सीबीआय व्हिजिलेन्सच्या या खुलाशामुळे समीर वानखेडे , अधिक्षक विश्व विजय सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण या सगळ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आर्यन खानच्या कुटुंबियांकडून 25 कोटी उकळण्याचा कट

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी आता हालचाली वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संशयितांना स्वतंत्र साक्षीदार के.व्ही.गोसावी यांच्या गाडीतून पैसे आणल्याचं आता तपासात उघड झालं आहे. के. व्ही. गोसावी यांना एनसीबी अधिकारी म्हणून दाखवण्यात आलं. तसंच त्यांचा सहकारी सॅनविल डिसोझा याने आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये घेण्याचा कट रचला. एवढंच नाही तर आर्यन खानला या प्रकरणात गोवण्याची धमकीही देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. अखेर 18 कोटींची डील झाल्याचं आता उघड झालं आहे. के.व्ही.गोसावी यांनी टोकन अमाऊंट म्हणून 50 लाख रुपये घेतले होते, अशीही माहिती मिळत आहे.

आर्यन खान प्रकरणात सीबीआयनं मुंबईतल्या वानखेडेंच्या घरावर छापा टाकला. भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शाहरुख खानच्या मुलाची अटक फक्त खंडणी उकळण्यासाठीच झाल्याचा दावा केला होता. आता त्याच आरोपात सीबीआयनं वानखेडेंच्या घरावर छापा टाकलाय. तसंच NCB व्हिजिलेन्सने या प्रकरणी मोठा खुलासा केलाय. आर्यन खानला प्रकरणात मोठा खुलासा 18 कोटींची डील झाल्याचं NCB व्हिजिलेन्सचं म्हणणं आहे.