मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वरळीतील 77 वर्षीय महिलेच्या (77 year old woman murder case) हत्या प्रकरणी नोकरासह त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी (25) फेब्रुवारीला वरळीतील सर पोचखानवाला रोड (Sir Pochkhanwala Road) परिसरात महिलेची हत्या करुन घरातून सोने आणि पैशांची चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी निशाद (Nishad) आणि अभिजीत जोरिया (Abhijit Joriya) अटक केली आहे. वरळीतील या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. हत्या झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. (Mumbai Police arrested two accused in 77 years old woman murder case of Worli)
मुंबई पोलिसांनी 77 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी निशाद आणि अभिजीत जोरिया या दोघांना अटक केली आहे. महिलेची हत्या झाल्यापासून निशाद फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय वाढला होता. हत्या झालेल्या महिलेने घरकामासाठी निशाद नावाच्या तरुणाला कामावर ठेवले होते. निशाद यानं महिलेने ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिची हत्या केली.
वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या
आरोपी निशाद आणि त्याचा मित्र अभिजीत जोरिया यांनी महिलेचा गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी या दोघांच्या शोधासाठी विशेष पथकं स्थापन केली होती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चार दिवसांमध्ये आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी चोरी झालेले दागिने आणि रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशाद हा मूळचा सहरानपूरचा रहिवासी आहे. तो संबंधित महिलेच्या घरी राहत होता आणि त्यानेच चोरीचा आणि हत्येचा कट रचला. पोलिसांनी महिलेची हत्या चोरीच्या उद्देशानं झाली असल्याचं स्पष्ट केले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि सोने, पैसे जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
कायदे मंत्री मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर का राहिले?, या मागे फडणवीस तर नाहीत?: काँग्रेसhttps://t.co/AOpkLDX37V#Devendrafadnavis | #bjp | #ravishankarprasad | #Congress | #sachinsawant
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
संबंधित बातम्या
पोलीस निरीक्षकाच्या दालनातच चाकू हल्ला; कराड शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग, केडीएमसी जंबो कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार
(Mumbai Police arrested two accused in 77 years old woman murder case of Worli)