सर्वात मोठी बातमी ! संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या, भांडूपमधून ताब्यात; दोघे राजकीय कार्यकर्ते?

| Updated on: Mar 04, 2023 | 9:30 AM

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती दुसरे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. यात दोनजण दिसत आहेत. एकाच्या अंगात हिरवे तर दुसऱ्याच्या अंगात राखाडी टीशर्ट आहे. दोघेही हाफ पँटवर आहेत.

सर्वात मोठी बातमी ! संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या, भांडूपमधून ताब्यात; दोघे राजकीय कार्यकर्ते?
sandip deshpande
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोन जणांना गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं आहे. या दोन जणांना भांडूपमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केलाय का? त्यांनी हल्ला का केला? हल्ल्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? संदीप देशपांडे यांच्यासोबत यांचं पूर्ववैमनस्य होतं का? हे दोघेही कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का? याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागचं नेमकं कारण उघड होणार आहे.

TV9 Marathi Live | Shinde Vs Thackeray | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Uddhav Thackeray

संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 8 पथके तैनात केली. या प्रकरणी दोन सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत शोध मोहीम हाती घेऊन भांडूपमधून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय वादातून हल्ला?

आरोपी हे भांडूप परिसरातील असल्याचं सांगितलं जातं. राजकीय वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यातून काही क्ल्यू पोलिसांच्या हाती आले आहेत. संदीप देशपांडे हे सातत्याने राजकीय विधाने करत होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला केल्याचं या दोन जणांनी कबुली देताना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. यातील एका आरोपीचं आडनाव सोळंकी तर दुसऱ्याचं खरात असल्याचं सांगितलं जात आहे. तो शिवसेनेशी संबंधित आहे की नाही याची चौकशी करण्यात येत आहे.

दुसरे सीसीटीव्ही फुटेज आले

दरम्यान, संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती दुसरे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. यात दोनजण दिसत आहेत. एकाच्या अंगात हिरवे तर दुसऱ्याच्या अंगात राखाडी टीशर्ट आहे. दोघेही हाफ पँटवर आहेत. दोघांनीही तोंडाला मास्क लावले असून एकाच्या डोक्यावर टोपी आहे. मात्र, या दोघांच्या हातात काहीच दिसत नाही. ना स्टम्प ना लोखंडी रॉड. फक्त हे दोघे चालताना दिसत असून त्यांचे चेहरे अर्धवट दिसत आहेत.

देशपांडे आज बोलणार

दरम्यान, संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते त्यांच्यावर हल्ला कुणी केला याची माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच या हल्ल्याच्या अनुषंगाने संदीप देशपांडे आणखी नवी माहिती देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आज काय बोलणार? याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलं आहे.