मुंबई पोलिसांची धडक कारवाई, 19 महिन्यात 1081 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 1073 आरोपींना अटक

| Updated on: Nov 15, 2019 | 8:08 PM

मुंबई पोलिसांच्या हद्दीत अमली पदार्थ आणि उत्तेजक पदार्थांचे (mumbai police one thousand crore charas and ganja seized) वापर वाढले आहेत.

मुंबई पोलिसांची धडक कारवाई, 19 महिन्यात 1081 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 1073 आरोपींना अटक
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थ आणि उत्तेजक पदार्थांचे (mumbai police one thousand crore charas and ganja seized) वापर वाढले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्याविरोधात राबविलेल्या मोहिमेत गेल्या 19 महिन्यात एक हजार 81 कोटींचे अंमली पदार्थ (mumbai police one thousand crore charas and ganja seized) हस्तगत केले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय) अनिल गलगली यांना दिली.

मुंबई पोलिसांच्या कार्यवाहीत 1073 आरोपींना अटक झाली आहे. तसेच यामध्ये हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी पदार्थांचा समावेश आहे.

गेल्या एक वर्षात मुंबई पोलिसांच्या हद्दीत अंमली आणि उत्तेजक पदार्थ अंतर्गत हस्तगत माल, पदार्थांचे नाव, एकूण किंमत आणि अटक आरोपींची संख्या किती आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे अर्ज करत विचारली होती.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद शिंदे यांनी अनिल गलगली यांना वर्ष 2018 आणि चालू वर्षांच्या सप्टेंबर 2019 पर्यंतची माहिती दिली. यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हे 1363 किलो 3241 ग्रॅम 1364 मिली ग्रॅम हस्तगत केले. या मालाची एकूण किंमत ही एक हजार 16 कोटी 32 लाख 56 हजार 45 रुपये अशी होती, तर एकूण 395 आरोपींना अटक करण्यात आली होती. यात सर्वाधिक आरोपी हे गांजा अंमली पदार्थांचे सेवन करत असून त्याची संख्या ही 194 होती.

तसेच 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 64 कोटी 64 लाख 62 हजार 352 रुपये किंमतीचा 169 किलो 4150 ग्रॅम 1282 मिली ग्रॅम असा माल हस्तगत करण्यात आला. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून एकूण 678 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

“मुंबईत बाहेरील राज्यांतून अंमली आणि उत्तेजक पदार्थाचा पुरवठा होत असून पोलीस कार्यवाहीची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. नागरिकांना सहभागी करत अंमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती आणि विशेष अभियान चालविण्याची गरज आहे”, असं मत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले.