मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आहे (Mumbai Pollution Air Quality). त्याशिवाय, आता मुंबईची हवा देखील प्रदुषित असल्याचं पुढे आलं आहे. आज सलग दहाव्या दिवशी मुंबईची हवा दुषित असल्याचं दिसून आलं आहे (Mumbai Pollution Air Quality).
मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. एअर क्वॉलिटी इंडेक्स 246 वर पोहोचला आहे. बंगळुरु वगळता देशातील सात मोठ्या शहरात हवा दुषित आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद, दिल्ली सगळ्यात जास्त दुषित आहे.
मुंबईतील वांद्र्याची हवा शुद्ध, एक्युआय – 46
बोरीवली एक्युआय – 334
मालाड – 349
कुर्ला – 332
पवई – 308
शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी हवेचा दर्जा घसरुन अतिवाईट स्तरावर पोहचला आहे. तर शहराच्या हवेत प्रदूषक घटकांचे प्रमाण दिल्लीपेक्षादेखील अधिक नोंदविण्यात आले आहे. शहर आणि उपगनरात सफरची (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अण्ड वेदर फोरकास्टिंग अण्ड रिसर्च) हवेची गुणवत्ता मोजणारी आठ केंद्रे असून, त्यापैकी पाच केंद्रावर हवेचा स्तर अतिवाईट नोंदविण्यात आला.
या सर्व ठिकाणी पीएम 2.5 या प्रदूषक घटकाचे प्रमाण 300 पेक्षा अधिक राहिले. गुरुवारी संपूर्ण मुंबई शहराच्या हवेत प्रदूषक घटकांचे प्रमाण 311 तर दिल्लीत 256 होते. मुंबईत सर्वाधिक प्रदूषण कुलाबा येथे आढळून आले.
Weather Report | शनिवारी पाऊस, मंगळवारी थंडी, बाहेर पडण्याआधी हा हवामान रिपोर्ट वाचाhttps://t.co/2gDqQhAW1E#WeatherUpdate #MumbaiRain #DelhiCold
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
Mumbai Pollution Air Quality
संबंधित बातम्या :
Indoor Air Pollution | बाहेरच नाही तर घरातही प्रदूषण, ‘या’ कारणांमुळे वाढतं घरातील प्रदूषण