Mumbai pollution: मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त धोकादायक, कोण कालवतंय मुंबईच्या हवेत विष?

| Updated on: Dec 13, 2022 | 3:15 PM

प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. मुंबईच्या प्रदूषणाला नेमके कोण जबादार आहे?

Mumbai pollution: मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त धोकादायक, कोण कालवतंय मुंबईच्या हवेत विष?
मुंबईचे प्रदूषण
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई,  देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची (Delhi Pollution) जगभरात चर्चा होत आहे, मात्र नुकतीच समोर आलेली माहिती जास्त धक्कादायक आहे. आर्थिक राजधानी मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीला मागे टाकले आहे. अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता (Mumbai air Quality) अत्यंत खालावलेली आहे. मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने 300 चा टप्पा ओलांडला तर काही ठिकाणी 345 पर्यंत पोहोचलेला आहे, ही पातळी अत्यंत खराब मानली जाते. सोमवारी मुंबईची एकूण AQI पातळी 225 नोंदवण्यात आली. तर दिल्लीची एकूण AQI पातळी 152 होती. ही आकडेवारी SAFAR (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) ची आहे ज्याने मुंबईची AQI पातळी खराब असल्याचे नोंदवले आहे.

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या AQI पातळीची नोंद झाली. मालाडमधील हवेची गुणवत्ता 311 होती जी अत्यंत खराब आहे. त्यापाठोपाठ मांढगाव आणि चेंबूरमध्ये 303 होते. वांद्रे-कुर्ला येथे AQI पातळी 269 नोंदवण्यात आली.

 

हे सुद्धा वाचा

काय असतो AQI?

 

AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता 168 (मध्यम) आणि दिल्लीतील 218 (खराब) आहे. आता CPCB आणि SAFAR च्या आकडेवारीत फरक का आहे याबद्दल जाणून घेऊया. खरं तर, SAFAR ची शहरातील नऊ ठिकाणी निरीक्षण केंद्रे आहेत तर CPCB 18 स्थानांवर आधारित एकूण AQI मोजते. दुसरीकडे, सीपीसीबीची दिल्लीत 36 वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत.


मुंबईतील प्रदूषणासाठी कोण जबाबदार?

काही दिवसांपूर्वी, G20 शेर्पा अमिताभ कांत आणि महापालिका आयुक्त IS चहल यांच्यात झालेल्या संभाषणात मुंबईतील खराब AQI चा मुद्दा पुढे आला होता. चहल यांनी मोठ्या प्रदूषणासाठी रिफायनरीज आणि टाटा पॉवर प्लांटला जबाबदार धरले, तर कांत यांनी सोमवारी सांगितले की, रिफायनरीजमधून सल्फर-डायऑक्साइड उत्सर्जन निर्धारित नियमांमध्ये होत आहे. कांत केंद्रीय पेट्रोलियम सचिव एम एम कुट्टी यांच्याशी देखील बोलले, म्हणाले की माहुल प्रदेशातील दोन रिफायनरींनी सल्फर उत्सर्जन कमी करणे अपेक्षित आहे.

दुसरीकडे यासाठी हवेतील आद्रता,  ढगाळ वातावरण आणि वाहनांच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.